पाच जिल्हे बनू लागले हरभरा पिकाचे आगार

एकूण खरेदीच्या सत्तर टक्के हरभरा खरेदी शक्य
Chana Production
Chana ProductionAgrowon

नांदेड : मराठवाड्यातील लातूर, नांदेड व हिंगोलीसह विदर्भातील अमरावती व बुलडाणा असे एकूण पाच जिल्हे हरभरा उत्पादनाचे आगार (Major District For Chana Production) बनत आहेत. हमीभाव (Gram MSP) खरेदीत या पाच जिल्ह्यात एकूण खरेदीच्या सत्तर टक्के हरभरा खरेदीचा अंदाज (Expected Chana Procurement) व्यक्त होत आहे. या भागात सध्या सर्वाधिक हरभरा खरेदी झाला आहे.

रब्बी हंगामात हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी हरभरा पिकाची पेरणी (Chana Crop Sowing) करत आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी खरिपातील सोयाबीन (Soybean), उडीद, मूग (Moong) पिकानंतर रब्बीमध्ये हरभरा पिकाची पेरणी करतात. कमी खर्चात चांगले उत्पादन येणारे पीक म्हणूनही या पिकाकडे पाहिले जाते. खरिपातील उत्पादनानंतर लगेच रब्बीत येणाऱ्या हरभरा पिकाच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना परतावा चांगला मिळत असल्याने शेतकरी या जोडपिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत.

Chana Production
नांदेडमध्ये ४० हजार क्विंटल हरभरा खरेदी

हरभऱ्याला केंद्र शासनाने पाच हजार २३० रुपये किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price For Chana) जाहीर केली आहे. यामुळे हरभरा उत्पादक शासकीय खरेदी केंद्राला हरभरा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करत आहेत. सध्या आधारभूत किंमतीनुसार राज्यातील वीस जिल्ह्यांत नाफेड, एफसीआय हरभऱ्याची खरेदी विविध एजन्सीच्या माध्यमातून करीत आहे. खरेदीच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती व बुलडाणा या पाच जिल्ह्यांत सर्वाधिक साडेनऊ ते दहा लाख क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. राज्यातील एकूण खरेदीत सत्तर टक्के हरभरा खरेदी या पाच जिल्ह्यांत होईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली व विदर्भातील अमरावती व बुलडाणा हे पाच जिल्हे हरभरा उत्पादनाचे आगार बनत आहेत. या भागातच सर्वाधिक शासकीय हरभरा खरेदीची शक्यता आहे.
योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com