आसाममधल्या चहाच्या मळ्यांना पुराचा फटका

आसाममधील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे जमिनीचे स्खलन झाले आहे. बराक आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या आजूबाजूच्या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आसाममधल्या चहाच्या मळ्यांना पुराचा फटका
Flood in AssamAgrowon

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आसाममध्ये संततधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या संततधार पावसाने आसामच्या चहा उद्योगाला (Tea Industry) मोठाच ब्रेक लावला आहे. सद्या बराक खोऱ्याला पूर आला असून या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आसामचा काही भाग पाण्याखाली गेला आहे.

आसाममधील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे जमिनीचे स्खलन झाले आहे. बराक आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या आजूबाजूच्या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्या घडी विस्कळीत झाली आहे. आणि चहाच्या उद्योगाला मोठा फटका बसल्याचे ‘इंडियन टी असोसिएशन’ने सांगितले.

आसाममधील या भीषण पुरामुळे चहा मळ्यांना मोठा फटका बसला आहे. चहाचे मळ्यावाले चहा बाहेर पाठवू शकले नाहीत.

Flood in Assam
चहा उद्योग क्षेत्राला हवंय स्पेशल पॅकेज !

पुरग्रस्त भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच संपर्कामध्येही अडथळे निर्माण होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर अन्नधान्याचा तुटवडा काही भागांमध्ये निर्माण होईल, अशी भीती ‘इंडियन टी असोसिएशन’ने व्यक्त केली आहे.

‘इंडियन टी असोसिएशन’ने या पुरग्रस्त भागातील लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या उद्योगाचे नुकसान टाळण्यासाठी आसाम सरकारकडे मदत मागितली आ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com