निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात स्वागत; दरातही सुधारणा
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात स्वागत; दरातही सुधारणा

कांदा बाजारात अस्थिरता

नाशिक जिल्ह्यात ५० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी; शेतकरी आक्रमक

नाशिक : चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी (Onion Cultivation) लागवड ते काढणीपर्यंत उत्पादन खर्च (Onion Input Cost) ३० ते ४० टक्क्यांनी वाढला. मात्र काढणीपश्‍चात (Post Harvesting) उत्पादकता घटली आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या उपलब्ध मालाची शेतकऱ्यांकडून कौटुंबिक गरज व खरिपाच्या तयारीसाठी विक्री होत आहे. मात्र उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी अस्थिरता व तफावत असल्याने उत्पन्नाचे गणित पुरते कोलमडले आहे.
जिल्ह्यात चालू वर्षी २,१६,६७४ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडी झाल्या आहेत. मागील वर्षी १,६६,५०४ हेक्टर वर लागवडी होत्या. तुलनेत ५० हजार हेक्टर लागवडी अधिक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र उत्पादकता कमी असताना देखील लागवडी वाढल्याने दर घसरल्याचे चित्र रंगवले जात आहे. सध्या तुलनेत होणारी आवक सर्वसाधारण आहे.

लासलगाव बाजार समितीमध्ये एप्रिल महिन्यात दररोज सरासरी २० हजार क्विंटल आवक राहिली. त्यास सरासरी ९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची स्थिती होती. तर चालू महिन्यात आवक वाढून सरासरी २५ ते ३० हजार क्विंटल होत आहे. त्यास सरासरी ८९० रुपये क्विंटल दर मिळत आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एप्रिलमध्ये किमान २२५ ते कमाल १,६२०, तर सरासरी ९६५ रुपये क्विंटलप्रमाणे दर राहिले. मात्र ते आता ८५० रुपयांवर आलेत. जिल्ह्यात प्रमुख बाजारांमध्ये सरासरी दराच्या खाली माल विकावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी :
सध्या शेतकरी आर्थिक गरजेनुसार माल बाजारात आणत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुणवत्तेचा माल शेतकऱ्यांच्या हातातून बाजारात जात असला, तरी त्यास अपेक्षित परतावा मिळत नसल्याने त्याची आर्थिक कोंडी होत आहे. दर बाजार समित्यांकडून जाहीर होत असले तरी प्रत्यक्षात किमान दराने अधिक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा सपाटा लावला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ‘साधा उत्पादन खर्चही वसूल होणार नसेल, तर उत्पादक कसा सावरणार,’ असा सवाल उपस्थित होत आहे. थोडक्यात, उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा फुकट दिला जातोय असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बाजार समित्यांमधील आवक व दर स्थिती (ता. १८)
बाजार समिती...आवक... किमान...कमाल... सरासरी
लासलगाव...१५,७४०...४००...१,३९०...९०१
मुंगसे, मालेगाव..२०,०००...२००...९०१...६७५
पिंपळगाव बसवंत...२३,९३३...२५०...१,५१०...८५०
सटाणा...११,२३०...१००...१,१००...७५०
उमराणे...१५,५०० ..६००...१,१२६...८००
येवला...६,०००...५०...९२५...६००
मनमाड...६,९३०...२००...१,०३६...६००
कळवण...३,७५०...२५०...१,५००...९००
देवळा...२,२१०...१००...१,२००...९००

जिल्ह्यात कांद्याला किमान ५० ते कमाल १५१० रुपये दर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या गुणवत्तेपेक्षा व्यापाऱ्यांची संख्या व खरेदी क्षमतेवर ठरतात दर ठरतात. बाजार समित्यांमध्ये दरात मोठी अस्थिरता व तफावत असल्याने नेमके दर निश्‍चितीचे धोरण काय ते सांगावे. ही लूट थांबली पाहिजे.
किरण मोरे, कांदा उत्पादक, ठेंगोडा, ता. सटाणा
राज्यात कांद्याचे किमान दर २ ते ४ रुपये प्रतिकिलो इतके खाली घसरल्याने १६ ते १८ रुपये उत्पादन खर्च होत असलेला कांदा विकून शेतकऱ्यांना पैसे मिळण्याऐवजी शेतकऱ्यांच्याच खिशातील पैसे जात आहेत. कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यासह राज्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची ही स्थिती आहे. राज्य व केंद्र सरकारने तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होईल.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com