वाडीशेवाळेतील कापूस उत्पादकांची फसवणूक

शेतकऱ्यांचे उपोषण; शेतकरी संघटनेचा पाठिंबा
वाडीशेवाळेतील कापूस उत्पादकांची फसवणूक
CottonAgrowon

जळगाव ः कापूस व्यापाऱ्याकडून (Cotton) फसवणूक (Fraud) झाल्याने वाडीशेवाळे (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषण (Strike) सुरू केले आहे.

या आंदोलनाला शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, जळगाव जागृत मंचने पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील व इतर नेते आणि जागृत मंचचे शिवराम पाटील हे या उपोषणात सहभागी झाले. गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांची परिसरातील व गावातील कापूस व्यापाऱ्यांनी सुमारे ९० लाखांची फसवणूक केली आहे.

दरवर्षी संबंधित व्यापाऱ्यांना गावातील शेतकरी कापसाची विक्री करायचे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादित केला होता. या विश्वासापोटी यंदाही संबंधित व्यापाऱ्यांना कापसाची विक्री शेतकऱ्यांनी विविध टप्प्यात केली. परंतु व्यापाऱ्यांनी त्याचे पैसे दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्रशासन व इतर यंत्रणांची मदत मागितली. परंतु प्रशासनाकडून मदत मिळाली नाही. व्यापाऱ्यांवर कारवाई झाली नाही. व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याने शेतकरी वित्तीय संकटात आले आहेत. त्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी कडूअप्पा पाटील यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com