Jinger Rate : आल्याचे दर दबावातच

राज्यातील आले उत्पादकांना मागील काही वर्षांपासून मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी आले उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करतात.
Jinger Rate
Jinger Rate Agrowon

पुणेः राज्यातील आले उत्पादकांना (Jinger Production) मागील काही वर्षांपासून मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी आले उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक (Jinger Crop) आतबट्ट्याचं ठरत आहे.

राज्यात आले पिकाखाली सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र विस्तारले होते. सातारा, औरंगाबाद, सांगली, पुणे, बीड आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये आले पिकांची लागवड विशेष वाढली. चार वर्षांपुर्वी आले पिकातून किमान बराबरी तरी होत होती, असे शेतकरी सांगतात.

Jinger Rate
Lemon : शेतकरी पीक नियोजन : लिंबू

आले पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकराला कमीत कमी ७५ हजारापासून चे दीड लाखापर्यंत सरासरी खर्च येतो. इतर पिकांच्या तुलनेत लागवडीपासून किमान सहा महिने हातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. त्यातच मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण बदलेले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो. यात आले टिकले तर उत्पादन हाताला लागते. अन्यथा मोठे नुकसान होते.

आले पीक किमान नऊ महिने जमीनीखाली राहिल्यास चांगले उत्पादन मिळते. जमीनीखाली पिक असल्याने अनेकवेळा पिकांच्या उत्पादनाचे अंदाज चुकत असतात. अशात दरातील घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असते. आले पिकांच्या एकरी किमान 20 गाड्या उत्पादन व प्रतिगाडीस 15 हजार रूपये दर अपेक्षित असतो. मात्र किड व रोग व दरातील अशाश्वतता यामुळे ही गणिती जुळत नसल्याने आले उत्पादकांची होरपळ सुरूच आहे.

आल्याचं पीक मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचं ठरतंय. यंदाही आल्याचे दर दबावात आहेत. त्यातच व्यापारी खेरदी करताना जूनं आणि नवं असा फरक करून दर देत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या २० दिवसांमध्ये आलं उत्पादक भागात जोरदार पाऊस पडला. परिमाणी आल्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या आणखी वाढल्या. सध्या बाजारात आल्याची आवक कमीच होत आहे. मात्र आल्याला २ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com