Rice Export : तुकडा तांदूळ निर्यातीला सरकारची मंजुरी पण…

Rice Rate : भारत सरकारने मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यतीवर बंदी घातली होती. देशातील वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता.
Rice Export
Rice ExportAgrowon

Rice Market : भारत सरकारने मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यतीवर बंदी घातली होती. देशातील वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. पण आता अन्नसुरक्षेसाठी तांदळाची मागणी करणाऱ्या देशांना सरकारच्या परवानगीनंतर तुकडा तांदूळ निर्यातीला सरकारने मंजुरी दिली आहे.

भारतात मागील हंगामात सरकारला भाताची खरेदी कमी करता आली. त्यातच भाताचे उत्पादन कहीसे कमी झाले होते. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात भाताला चांगली मागणी होती. याच काळात भारतात तांदूळ उपलब्ध होता. यामुळे भारतातून चांदूळ निर्यात वाढली. परिणामी देशात तांदळाचे भाव वाढ होते.

गहू दरवाढीचा झटका बसल्यानंतर सरकारने तांदूळ निर्यातीवर निर्बंध घातले. सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये तुकडा तांदळाची निर्यात बंद केली. तर विविध वाणांच्या तांदूळ निर्यातीवर २० टक्के निर्यातशुल्क लावले.

Rice Export
Rice Harvesting : माणगावात भातकापणीला वेग

भारत सरकारने आता तुकडा तांदूळ निर्यातीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. आपली अन्न सुरक्षा राखण्यासाठी तांदळाची मागणी करणाऱ्या देशांना केंद्र सरकारच्या परवानगीनंतर निर्यात करता येणार आहे. म्हणजेच निर्यातदारांना थेट निर्यात करता येणार नाही.

विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुकडा तांदूळ निर्यातीवर तसं पाहीलं तर बंदीच आहे.

सरकारच्या परवानगीशिवाय निर्यातदारांना तांदूळ पाठवता येणार नाही. फक्त एखाद्या देशाला अन्न सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच निर्यात करता येईल. तेही तेथील सरकारने मागणी केल्यानंतर परवानगी मिळेल.

डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने सेंद्रीय नाॅन बासमती आणि सेंद्रीय नाॅन बासमती तुकडा तांदूळ निर्यातीला परवानगी दिली होती. भारताच्या तुकडा तांदळाचा सर्वात मोठा ग्राहक चीन आहे. चीनसोबतच सेनेगल, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांनाही तुकडा तांदळाची निर्यात होते. पण भारताने तुकडा तांदूळ निर्यातीवर बंद घातल्याने या देशांना तांदळाचा तुटवडा जाणवत होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com