सरकारी गहू खरेदीत ५७ टक्के घट

केंद्र सरकारकडून हमीभावाने (MSP) केल्या जाणाऱ्या गहू खरेदीचं (Wheat Procurement) उद्दीष्ट यंदा हुकलं आहे.
सरकारी गहू खरेदीत ५७ टक्के घट
Wheat Procurement Agrowon

केंद्र सरकारकडून हमीभावाने (MSP) केल्या जाणाऱ्या गहू खरेदीचं (Wheat Procurement) उद्दीष्ट यंदा हुकलं आहे. यंदा मूळ उद्दीष्टाच्या तुलनेत गव्हाची सरकारी खरेदी ५७.५ टक्क्यांनी कमी झाली. सरकारने सुरूवातीला चालू वर्षांत ४४४ लाख टन गहू खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं.

मात्र उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनात घट झाल्याने हे उद्दीष्ट कमी करण्यात आले. त्यानुसार सरकार १९५ लाख टन गहू खरेदी करणार होतं. परंतु हे सुधारित उद्दिष्टही गाठता आलेलं नाही. भारतीय अन्न महामंडळाने खरेदी कालावधी संपताना १८७ लाख टन गव्हाची खरेदी केली आहे.

खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने धान्याच्या गुणवत्तेचे निकष शिथिल केले होते. ज्यामुळे अन्न महामंडळाला १८ टक्क्यापर्यंत खराब झालेल्या धान्य खरेदीची परवानगी देण्यात आली होती. तसेच खराब धान्यालाही प्रति क्विंटल २०१५ रुपये हमीभाव देण्यात आला. त्यातच सरकारने अन्नधान्य टंचाईचे कारण देत गहू निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही.

गहू काढणीच्या वेळी आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनाला फटका बसला. मात्र त्याचबरोबर जागतिक बाजारात मागणी वाढल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी गहू खरेदी केला. त्यामुळे सरकारला खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करता आलं नाही. केंद्र सरकार कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या अन्नधान्याचं वाटप करतं. त्यासाठी अन्न महामंडळामार्फत हमीभावाने गव्हाची खरेदी करण्यात येते.

दरम्यान केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमध्ये गव्हाऐवजी तांदळाचा वापर वाढवला आहे. या योजनेतंर्गत वाटप करण्यात येणार गहू १८२ लाख टनावरून ७१ लाख टन करण्यात आला आहे. तर तांदळाचे प्रमाण २१६ लाख टनावरून ३२७ लाख टनापर्यंत वाढवले आहे, सरकारला या योजनेसाठी पुढील वर्षी एप्रिलपर्यंत ३२० लाख टन अन्नधान्याची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com