देशी गाय खरेदीसाठी हरियाणात २५ हजारांचे अनुदान

२ ते ५ एकर शेती असलेल्या आणि स्वतःहून नैसर्गिक शेती (natural farming) करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गाय खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (subsidy) देण्यात येणार आहे.
Indian Cow
Indian CowAgrowon

वृत्तसंस्था
चंदीगड :
देशी गायीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हरियाणाचे (Haryana) मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी रविवारी (२६ जून) ही घोषणा केली.

कर्नाल येथे नैसर्गिक शेतीवर आधारित राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात खट्टर बोलत होते. २ ते ५ एकर शेती असलेल्या आणि स्वतःहून नैसर्गिक शेती (Natural Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गाय खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान (subsidy) देण्यात येणार असल्याचे खट्टर म्हणाले.

राज्यात नैसर्गिक शेतीला (Natural Farming) चालना देण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने राज्यात ५० हजार एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. नैसर्गिक शेतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुकापातळीवर प्रदर्शने आयोजित केले जात आहेत.

संपूर्णतः नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) अंगीकार करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले असून हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही नैसर्गिक शेतीच्या प्रचारासाठी काम सुरु आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशी गोपालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्याचे खट्टर म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे (Natural Farming) महत्व पटत असून ते स्वतःहून राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर त्यासाठी नोंदणी करत आहेत. अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना देशी गाय खरेदी करण्यासाठी अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. राज्यात आतापर्यंत १२५३ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला असून तशी नोंदणी संबंधित संकेतस्थळावर केली.

साठच्या दशकात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे हरित क्रांतीचा नारा देण्यात आला. रासायनिक खतांच्या वापराचा आग्रह धरण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात देशभरात रासायनिक खतांचा अतिवापर झाल्याचेही खट्टर यांनी नमूद केले.

जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी लक्षात घेत राज्य सरकारकडून 'मेरा पाणी मेरी विरासत' अभियान राबवले जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी 'भावांतर भरपाई योजना' राबवली जात असल्याची माहिती यावेळी कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com