Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुटसाठी हरियाणात सव्वा लाखाचे अनुदान

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून एकरी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

सध्या बाजारात किवी, पॅशन फ्रुट आणि ड्रॅगन फ्रुट सारख्या विदेशी फळांना चांगली मागणी आहे. त्यातल्या ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) बाजारात चांगलाच बोलबाला आहे. भारतातही शेतकरी मोठ्या प्रमाणात या फळांची लागवड करत आहेत. केंद्र सरकारकडून त्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे.

गुजरात सरकारने तर जानेवारी २०२१ मध्ये ड्रॅगन फ्रूटचे कमलम' (Kamlam) असे बारसे करून त्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातही अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. हे फळ खूपच चर्चेत आले आहे.

Dragon Fruit
Organic Farming: सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारचा पुढाकार

या विदेशी फळाचा बोलबाला होण्यामागे या फळात असणारे पोषक तत्व कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. ड्रॅगन फ्रूट म्हणजे आरोग्याचा खजिना असल्याचे दावे केले जातात.ड्रॅगन फ्रूटची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड असते. या फळात अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर आढळतात. हे फळ मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करते, असे सांगण्यात येते.

ड्रॅगन फ्रूटचे (Dragon Fruit) उत्पादन घेणाऱ्या हरियाणातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ड्रॅगन फ्रुट लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून एकरी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Dragon Fruit
Compensation : झारखंडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

हरियाणा सरकारच्या फळबाग विकास योजने अंतर्गत ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Cultivation) लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी १ लाख २० हजारांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मिश्रा यांनी सांगितले.

लवकरात लवकर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी १० एकरपर्यंतच्या लागवडीसाठी या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना 'मेरी फसल मेरा ब्योरा' च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार असल्याचे मिश्रा म्हणाल्या.

Dragon Fruit
MSP Procurement : दिल्लीत २०१६ नंतर एफसीआयकडून खरेदीच नाही

दरम्यान गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) देशभरात लागवड वाढली. या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. ड्रॅगन फळाचे उत्पादन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर घेतले जाते.

पशुसंवर्धनासाठी ब्राझीलसोबत सहकार्य
पशु संवर्धनासाठी हरियाणा सरकार ब्राझीलसोबत सहकार्य करणार असल्याची माहिती हरियाणाचे कृषी मंत्री जे. पी. दलाल यांनी दिली. गीर असोसिएशन ऑफ ब्राझीलने (Gir Association of Brazil) हरियाणातील मुऱ्हा जातीच्या म्हशींची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव हरियाणा पशुधन विकास महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ ब्राझीलियन झेबू ब्रीडर्सकडून (ABCZ) हरियाणात गीर जनावरांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी करण्यात येणार असल्याचेही दलाल यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com