खतांच्या लिंकिंगबाबत उत्पादक, पुरवठादारांची बैठक घ्या

‘माफदा’चे कृषी आयुक्‍तांना पत्र; तातडीने कार्यवाहीची मागणी
खतांच्या लिंकिंगबाबत उत्पादक, पुरवठादारांची बैठक घ्या
FertilizerAgrowon

औरंगाबाद: खरीप हंगामामध्ये रासायनिक खतासोबत (Chemical Fertilizer) लिंकीग (Linking) होत आहे. याबाबत निर्माण झालेल्या अडचणीसंबंधी चर्चा करण्यासाठी रासायनिक खते उत्पादक (fertilizer Producer) व पुरवठादार (fertilizer Supplyer), प्रमुख अधिकारी तसेच ‘माफदा’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी, असे विनंतीपत्र महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्‌स सिड्‌स डीलर्स असोसिएशनने सोमवारी (ता.२०) कृषी आयुक्त धीरजकुमार (Dheeraj Kumar) यांना दिले.

खरीप हंगामामध्ये बियाणे, रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे. कोरोनामुळे विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले. तरीही कृषी विभागाकडून विक्री व्यवसाय करण्यासाठी मिळणाऱ्या सहकार्यामुळे, विक्रेत्यांनी बॅंकाकडून कर्ज घेऊन बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा विक्री केंद्रामध्ये ठेवला आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खते विक्रेत्यांना युरिया व मिश्रखते पुरवठा करताना उत्पादक व पुरवठादार कंपन्यांकडून इतर खतांची खरेदी करण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. विक्रेत्याची मागणी नसतानाही युरिया व मिश्रखतांसोबत इतर माल लिंकिंग पद्धतीने विक्रीसाठी विक्रेत्यास पुरविलेला आहे. लिंकींगला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, बहुसंख्य विक्रेत्यांनी लिंकिंग पद्धतीने विक्री बंद ठेवली असल्याने विक्रेत्यांकडे माल विक्री केंद्रांत पडून आहे. या शिवाय कंपन्यांनी खरीप हंगामात रासायनिक खते विक्री केंद्रांत पोहोच पद्धतीने देण्यासाठी वाहतूक व हमालीची रक्कम आकारणी केली. त्यामुळे या खर्चासह येणारी किंमत, पॅकिंग एमआरपीपेक्षा जादा होत आहे. एमआरपी दराने विक्री करणे तोट्याचे व बेकायदेशीर असल्याने विक्रेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. या अडचणी दूर करण्याबाबत जिल्हा संघटनांकडून ‘माफदा’कडे मागणी करण्यात आली आहे. लिंकिंग पद्धती त्वरित थांबणे अत्यावश्‍यक आहे. या साठी कृषी आयुक्तालयामध्ये तातडीने बैठक घेण्याची मागणी ‘माफदा’ने केली आहे.

लिंकिंग, जादा दरास कंपन्या, पुरवठादार जबाबदार

विक्रेत्यांचा कोणताही दोष नसताना ते बदनाम होत असून विक्रेतेच लिंकिंग करतात व जादा दराने खते विक्री करतात, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याबाबत विक्रेत्यांवर आरोप होत आहेत. त्यास केवळ खते उत्पादक व पुरवठादार कंपन्या जबाबदार असल्याचे ‘माफदा’चे म्हणणे आहे. कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांचे बियाणेच विक्रेते विक्री करीत असल्याने बोगस बियाणे विक्री होते, अशा आरोपाबाबत बोगस बियाण्याची व्याख्या काय आहे? हा प्रश्न निर्माण झाल्याचे ‘माफदा’चे

‘माफदा’च्या मागण्या

- कंपन्यांकडून होणारी लिंकिंग बंद व्हावी.

- युरिया, मिश्रखते व कॉम्प्लेक्‍स खतांचा पुरवठा ‘एफओआर’ पद्धतीने व्हावा.

- विक्रेत्यांकडील वाहतूक व हमाली खर्च आकारणी बंद व्हावी

- कॉम्प्लेक्‍स खतांवरील विक्री मार्जिन ८ टक्के द्यावे

- रासायनिक खते वाहतुकीसाठी पुरेशा रेल्वे वॅगन उपलब्ध कराव्यात

- रासायनिक खतपुरवठा सुरळीत व्हावा

- रासायनिक खतांचे विक्री मार्जिन ६०० रुपये करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com