Honey Export : देशातील मध उत्पादन ७ टक्क्यांनी तर निर्यात २४ टक्क्यांनी वाढली: तोमर

देशातील मध उत्पादन २०२०-२१ मध्ये १ लाख २५ हजार टन होते. ते २०२१-२२ पर्यंत १ लाख ३३ हजार २०० टनांवर पोचले. या काळात देशातील मध उत्पादनात जवळपास ७ टक्क्यांची वाढ झाली.
Honey
HoneyAgrowon

Honey Production : देशातील मध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मध उत्पादनात ७ टक्क्यांची वाढ झाली. तर मध निर्यात २४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नही वाढले, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली.

लोकसभेत राष्ट्रीय मधमाशीपालन आणि मध मिशनवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी ही माहिती दिली.

आपल्या उत्तरात कृषिमंत्री तोमर म्हणाले की, देशातील मध उत्पादन २०२०-२१ मध्ये १ लाख २५ हजार टन होते. ते २०२१-२२ पर्यंत १ लाख ३३ हजार २०० टनांवर पोचले. या काळात देशातील मध उत्पादनात जवळपास ७ टक्क्यांची वाढ झाली.

देशातून मध्य निर्यात २०२०-२१ यावर्षात ६० हजार टन झाली होती. तर २०-२१-२२ मध्ये मधाची निर्यात जवळपास ७५ हजार टनांवर पोचली. म्हणजेच मध निर्यात २४ टक्क्यांनी वाढली. मधाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे, असेही कृषिमंत्री तोमर यांनी स्पष्ट केले.

Honey
Honey Production : पाटगावच्या मधाचा गोडवा जगभर पसरणार

देशातील मध उत्पादन १ लाख ६० हजार टनांवर नेण्याचे उद्दीष्ट असून त्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करत आहे, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री म्हणाले की, सरकारने मधमाशी पालनाविषयी जनजागृती केली.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. सेमिनार, वर्कशाॅप, प्रशिक्षण केंद्रांची आणि मध्यमाशी विकासासाठी केंद्रे उभारली इत्यादी कामे सरकारने केली. त्यामुळे देशातील मध्य उत्पादनात वाढ झाली.

मधमाशीपालनासाठी ८० एफपीओ स्थापन

केंद्र सरकारने देशात १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहेत. त्यापैकी १०० शेतकरी उत्पादक कंपन्या मधमाशी पालनाशी संबंधित असतील.

आत्तापर्यंत ८० शेतकरी उत्पादक कंपन्यांची मधमाशी पालन व्यवसायासाठी स्थापना झाली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Honey
Honey Village : ‘मधाचे गाव’ समृद्ध गावाच्या दिशेने एक पाऊल
देशातील मध उत्पादन २०२०-२१ मध्ये १ लाख २५ हजार टनांवरून २०२१-२२ पर्यंत १ लाख ३३ हजार २०० टनांवर पोचले. तर निर्यात २५ टक्क्यांनी वाढून ६० हजारांवरून ७५ हजारांवर पोचली. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढीला मदत मिळाली.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com