
अनिल जाधव
पुणेः भारतात यंदा कापूस (Indian Cotton) पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा (Climate Change) मोठा फटका बसला होता. त्यामुळे कापूस उत्पादन (Cotton Production) गेल्यावर्षी ऐवढेच होईल, असे शेतकरी सांगत होते. मात्र विविध संस्थांनी यंदा कापूस उत्पादन वाढल्याचे अंदाज व्यक्त केले आहेत.
अमेरिकेच्या कृषीविभागाने यंदा भारतात ३४९ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यात बदलही होऊ शकतो. कारण मागील हंगामात युएसडीएने ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात ३५५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हंगामाच्या शेवटी देशातील कापूस उत्पादन ३११ लाख गाठींवर स्थिरावल्याचे म्हटले होते.
तसेच काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्था सीएआयनेही यंदाच्या हंगामातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात केली आहे. पुढील काळातही सीएआय उत्पादनाचा अंदाज कमी करेल, असं जाणकार सांगत आहेत. कारण दरवर्षी असच घडत असते.
मागील हंगामात सीएआयने ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. नंतर उत्पादन ३३५ लाख गाठींवर स्थिरावेल, असे म्हटले होते. पण त्यानंतर अंदाज सतत बदलत ३२५ लाख गाठी, नंतर ३१५ आणि शेवटी ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने स्पष्ट केले.
……….
सीएआयचे यंदाचे अंदाज
यंदाही हंगामाच्या आधी सीएआयने ३७५ लाख गाठींपर्यंत कापूस उत्पादन वाढेल, असे म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये ३६५ वरून ३४३ लाख गाठींवर सीएआयचा अंदाज आला. तर ताज्या अंदाजानुसार सीएआयनं ३३९ लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलंय.
महाराष्ट्रात खरच उत्पादन वाढले का?
म्हणजेच सीएआय आपला अंदाज कायम ठेवत नाही. त्यामुळं यंदाही कापूस उत्पादन गेल्यावर्षीएवढंच राहील, असा अंदाज आहे. सीएआयनं आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि हरियानात कापूस उत्पादन कमी झाल्याचं सांगितलं. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उत्पादन वाढल्याचा अंदाज व्यक्त केला. पण महाराष्ट्रातील शेतकरी वेगळंच सांगतात. उत्पादकता यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.