Cotton : कापसावर तत्काळ ५० टक्‍के आयात शुल्क लावा ः जावंधिया

केंद्र सरकारने प्रक्रिया उद्योजकांच्या दबावाला बळी पडत कापसावरील आयातशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Cotton
Cotton Agrowon

नागपूर ः केंद्र सरकारने प्रक्रिया उद्योजकांच्या (Processing Industry) दबावाला बळी पडत कापसावरील आयातशुल्क (Import Duty On Cotton) रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम कापसाच्या दरावर (Cotton Rate) होणार असल्याने या निर्णयाचा फेरविचार करीत कापसावर तत्काळ ५० टक्‍के आयातशुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया (Vijay Jawandhiya) यांनी केली.

Cotton
कापूस पिकाची लागवड करताना काय खबरदारी घ्यावी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार, भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २०२१-२२ या हंगामात ८ हजार ते १३ हजार रुपये प्रती क्‍विंटलचा दर मिळाला. जागतिक बाजारात त्या वेळी तेजी असल्याने हा उच्चांकी दर व्यापाऱ्यांनी दिला. ७०-८० सेंट प्रतिपाउंड असा असलेला रुईचा दर १ डॉलर ७० सेंटपर्यंत वधारला होता. सोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयांचे अवमूल्यन सातत्याने होत होते. १ डॉलरचा दर ७५-७८ रुपये झाला होता. परिणामी, देशांतर्गत बाजारही तेजीत होता. प्रक्रिया उद्योजकांना महाग कापूस विकत घ्यावा लागत असल्याने त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकत कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यास बाध्य केले.

Cotton
BT Cotton Seed : बीटी कापूस बियाण्यांच्या सोळा लाख पाकिटांची विक्री

आता २०२२-२३ या वर्षातील हंगाम सुरू झाला आहे. या हंगामातील कापूस बाजारात येईपर्यंत कापसाचे दर ३० हजार रुपये प्रतिगाठ (१.७० क्‍विंटल रुई) याप्रमाणे होतील. गेल्या हंगामात हे दर ५० ते ५१ हजार रुपये इतके उच्चांकी होते. जागतिक बाजारातदेखील १ डॉलर ७० सेंट प्रतिपाउंड रुईचा दर आजच १ डॉलर २४ सेंटपर्यंत खाली आला आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत ते ८० सेंट इतके खाली येण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क रद्द केल्यापासून आजपर्यंत १६ लाख गाठींच्या आयाती संदर्भातील व्यवहार झाला आहे. त्यात येत्या काळात वाढीची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम येत्या हंगामातील कापूस दरावर होत शेतकऱ्यांना कमी दर मिळतील. त्याची दखल घेत कापसावर तत्काळ ५० टक्‍के आयात शुल्क लावण्यात यावे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती. भारतातून गहू निर्यात होत होती. त्या वेळी आपण तत्काळ गहू निर्यात बद करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कापूस आयात शुल्क कपातीचा निर्णय मागे घ्यावा. उच्चांकी दर १३ हजार रुपये क्‍विंटलवरून आजच कापूस ७ हजार ते ८ हजार रुपये क्‍विंटलवर आला आहे. ज्याप्रमाणे ४० रुपये प्रती किलोपेक्षा अधिक दर असतील तरच साखर निर्यात करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कापूस उत्पादकांच्या हितासाठी ८० हजार रुपये प्रतिखंडी रुई (४० हजार रुपये प्रतिगाठ) चा दर झाल्याशिवाय आयातीला परवानगी दिली जाणार नाही, असे धोरण निश्चित करावे, अशी मागणीदेखील जावंधिया यांनी पत्रातून केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com