Banana Rate : केळीच्या भावात सुधारणा

मागील सात वर्षांच्या कालावधीत यंदा केळीला मिळालेल्या भावाने उच्चांक गाठला. त्यामुळे उत्पादक आनंदी तर झालाच, पण या भवात सुधारणा झाल्यामुळे आता केळी लागवडक्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Banana Rate
Banana RateAgrowon

पथ्रोट, अमरावती : मागील सात वर्षांच्या कालावधीत यंदा केळीला (Banana Rate) मिळालेल्या भावाने उच्चांक गाठला. त्यामुळे उत्पादक आनंदी तर झालाच, पण या भवात सुधारणा झाल्यामुळे आता केळी लागवडक्षेत्रात (Banana Cultivation) वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आजघडीला पंधरा किलोच्या केळीला १७५० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर बऱ्हाणपूर या भागात हाच भाव २३०० रुपयांच्या जवळपास आहे.

Banana Rate
केळी दरात सुधारणा सुरूच

आधी पथ्रोट परिसर संत्र्यासह केळीचे मोठे उत्पादक क्षेत्र म्हणून गणले जायचे. त्यामुळेच या ठिकाणावरून केळी परराज्यात पाठविताना येथे केला सप्लायर्स म्हणून दहा ते अकरा प्रतिष्ठाने उदयास आली. परंतु, हळूहळू पाण्याची पातळी खाली गेल्याने त्याचा परिणाम केळी उत्पादनावर झाला. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून नगदी स्वरूपाचे असणारे केळीचे पीक वाचविण्यासाठी प्रचंड मेहनत केली. पण त्यानंतर सुरू झालेले भारनियमन, वन्यप्राण्यांचा हल्ला, वातावरणाचा असमतोल तसेच वादळवाऱ्यात होणारे केळी पिकाचे नुकसान वाढत गेले.

Banana Rate
केळी उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

परिणामी शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित बिघडत जात असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांपैकी अनेकांनी इतर दुसऱ्या पिकांकडे आपला कल वाढविला. मग अशावेळी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या केला सप्लायर्स यांनी दुसऱ्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आधार घेऊन आपला व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळेच रोज पथ्रोटवरून तीस ट्रकच्या जवळपास केळी परराज्यात पाठविण्यात येत होती. परंतु, आता नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी मिळत असल्याने तो आकडा सात ते आठ ट्रकवर येऊन ठेपला आहे. केळी उत्पादनासाठी वातावरणाचा समतोल बिघडल्याने या भागात शेकडोंमध्ये असणारी केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सध्याच्या घडीला बोटावर मोजण्याइतकीच राहिलेली आहे.

आता केळीला मिळत असलेला भावाचा उच्चांक पाहता पाण्याची मुबलक व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी केळी लागवडीची तयारी सुरू केली आहे. केळीला मिळणारी ही भाववाढ मागील सात वर्षांच्या तुलनेत सर्वांत जास्त असून यावर्षीच्या अति उष्ण तापमानामुळे अनेक शेतकऱ्यांची केळी नष्ट झाली. अशातच केळीची मागणी वाढली, त्यामुळे भाववाढ होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्या केळीला मिळणारा भाव लक्षणीय आहे. पुढे हिंदू संस्कृतीमधील सण, उत्सवांना सुरुवात होणार आहे. तेव्हाही भाववाढ अधिक होण्याचे संकेत आहेत.
सुबोध चिठोरे, शेतकरी, केला सप्लायर्स पथ्रोट.

केळीची सोशल मीडियावर धूम

मागील सात वर्षांपासून केळीचे भाव घसरले होते. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांनी आपल्या केळीच्या बागा नष्ट केल्या; मात्र यंदा केळीला उच्चांकी भाव मिळत असल्याने नेटकऱ्यांसह शेतकऱ्यांनी केळीच्या घडावर मुकुट चढविलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे केळीची सर्वत्र चर्चा होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com