Tobacco Export: आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदाच १२० टन तंबाखूची निर्यात

राज्य सरकारची नोडल एजन्सी म्हणून आंध्र प्रदेश मार्कफेडकडून काही कमोडिटीजची खरेदी केली जाणे स्वाभाविक आहे. मात्र मार्कफेडकडून तंबाखू खरेदीची ही पहिलीच वेळ होती. एरवी खाजगी व्यापारी आणि तंबाखू कंपन्या शेतकऱ्यांकडून तंबाखू (Tobacco) खरेदी करतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करत असतात.
Tobacco Production
Tobacco ProductionAgrowon

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मार्कफेडने अमेरिकाला १२० टन तंबाखू निर्यात (Tobacco Export) केली असून सरकारी यंत्रणेकडून करण्यात आलेली ही पहिलीच निर्यात ठरली. या निर्यातीमुळे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

देशभरात तंबाखू उत्पादनात आंध्र प्रदेशचा (Andhra Pradesh) पहिला क्रमांक आहे. केंद्र सरकार तंबाखू बोर्डाच्या (Tobacco Board) माध्यमातून देशभरातील उत्पादनाचे नियमन करते. २०२१ ला तंबाखू बोर्डाने आंध्र प्रदेशला १३० दशलक्ष किलो उत्पादनाचा कोटा ठरवून दिला होता. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आंध्र प्रदेश मार्कफेडने २०२० मध्ये शेतकऱ्यांकडून १.३ दशलक्ष तंबाखू खरेदी केली होती.

Tobacco Production
Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रुटसाठी केंद्राचा पुढाकार

राज्य सरकारची नोडल एजन्सी म्हणून आंध्र प्रदेश मार्कफेडकडून काही कमोडिटीजची खरेदी केली जाणे स्वाभाविक आहे. मात्र मार्कफेडकडून तंबाखू खरेदीची ही पहिलीच वेळ होती. एरवी खाजगी व्यापारी आणि तंबाखू कंपन्या शेतकऱ्यांकडून तंबाखू (Tobacco) खरेदी करतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करत असतात.

Tobacco Production
Kharif sowing :तेलबिया लागवड क्षेत्रात २० टक्क्यांची घट

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ,प्रक्रिया साखळी नसल्याने अथवा निर्यातीची व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील यंत्रणा सहसा तंबाखू खरेदी (Tobacco Procurement) अथवा निर्यातीच्या व्यवहारात पडत नाहीत.

आम्ही आंध्र प्रदेशातील १२० टन तंबाखू अमेरिकेला निर्यात केली. चेन्नईच्या बंदरावरून हा माल रवाना करण्यात आला. अमेरिकेच्या मागणीनुसार तंबाखूवर (Tobacco) प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून हा माल अमेरिकेत पाठवण्यात आल्याचे मार्कफेडमधील सूत्रांनी सांगितले. राज्याच्या एकूण उत्पादनातील तीन चतुर्थांश तंबाखू देशांतर्गत बाजारात विकली असून उर्वरित मालावर प्रक्रिया करून तो निर्यात करण्यात आल्याचे मार्कफेडच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Tobacco Production
Basmati export : बासमती निर्यात दरात विक्रमी वाढ

तंबाखू निर्यातीच्या या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर मार्कफेडने तंबाखू उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली. मार्कफेडने त्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा विभाग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तंबाखू निर्यातीच्या (Tobacco Export) संधी शोधणार आहे. सरकारी यंत्रणेकडून खरेदी करण्यात आलेल्या तंबाखूवर प्रक्रिया करून ती देशाबाहेर निर्यात करण्याचा हा प्रयत्न एक प्रकारे विक्रमच ठरला आहे.

Tobacco Production
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊन शकत नाही : ठाकरे

अमेरिकेनंतर (USA) आंध्र प्रदेश मार्कफेडची (Markfed) नजर युरोपियन युनियनमधील (European Union)खरेदीदारांची गरज कशी भागवता येईल, यावर असल्याचेही मार्कफेडचे म्हणने आहे. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठीही ही चांगल्या आर्थिक उत्पन्नाची संधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com