हिंगोलीत हरभरा ३८५० ते ४३६० रुपये क्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारा (भूसार मार्केट) मध्ये सोमवारी (ता. २) हरभऱ्याची ४५५ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ३८५० ते कमाल ४३६० रुपये तर सरासरी ४१०५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Chana Bajarbhav
Chana BajarbhavAgrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारा (भूसार मार्केट) मध्ये सोमवारी (ता. २) हरभऱ्याची ४५५ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला (Chana Rate) प्रतिक्विंटल किमान ३८५० ते कमाल ४३६० रुपये तर सरासरी ४१०५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. (Hingoli APMC)

हिंगोली बाजार समित्याच्या भूसार मार्केटमध्ये सोमवारी (ता. २५) ते शुक्रवार (ता. २९) या कालावधीत हरभऱ्याची (Chana Arrival) एकूण १५२४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ३८५० ते कमाल ४४५० रुपये दर मिळाले. मागील आठवड्याप्रमाणे हरभऱ्याच्या किमान तसेच कमाल दरात घसरण सुरू आहे. शुक्रवारी (ता. २९) हरभऱ्याची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९१९ ते कमाल ४४२६ रुपये तर सरासरी ४१७२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २७) हरभऱ्याची ६९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४४५० रुपये तर सरासरी ४३२५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २५) हरभऱ्याची २२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९५० ते कमाल ४३७५ रुपये तर सरासरी ४१६२ रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com