परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अठराशेंवर शेतकऱ्यांना चुकाऱ्यांची प्रतीक्षा

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांवर १३ हजार ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १८ जूनपर्यंत या सर्व केंद्रांवर ११ हजार ४६० शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ५२० क्विंटल हरभरऱ्याची (Harbhara) विक्री केली.
Harbhara
HarbharaAgrowon

परभणी ः नाफेडच्या वतीने राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १६ केंद्रावरील हमीभावाने हरभरा (Harbhara) खरेदीपैकी सोमवार (ता. ११) पर्यंत १९ हजार ७ शेतकऱ्यांना २ लाख ६० हजार ६२० क्विंटल हरभऱ्याचे १३६ कोटी ३० लाख ४५ हजार ८९४ रुपये एवढे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून १ हजार ८१४ शेतकऱ्यांच्या २३ हजार ६८६.०३ क्विंटल हरभऱ्याचे १२ कोटी ३८ लाख ७७ हजार ९३६ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहे.

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांवर १३ हजार ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १८ जूनपर्यंत या सर्व केंद्रांवर ११ हजार ४६० शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ५२० क्विंटल हरभरऱ्याची (Harbhara) विक्री केली.

सोमवार (ता. ११) पर्यंत १० हजार ३०८ शेतकऱ्यांना १ लाख २६ हजार ७०३.१ क्विंटल हरभऱ्याचे ६६ कोटी २६ लाख ५७ हजार २१३ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. अजून १ हजार १५२ शेतकऱ्यांच्या १२ हजार ८१६.०९ क्विंटल हरभऱ्याचे (Harbhara) ६ कोटी ७० लाख ३२ हजार ३८७ रुपये एवढे चुकारे येणे बाकी आहे.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव नाका, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या आठ केंद्रांवर ९ हजार ६९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.त्यापैकी ९ हजार ३६१ शेतकऱ्यांनी १ लाख ४४ हजार ७८६ हरभऱ्यांची विक्री केली.

सोमवार (ता. ११) पर्यंत ८ हजार ६९९ शेतकऱ्यांना १ लाख ३३ हजार ९१७.५३ क्विंटल हरभऱ्याचे ७० कोटी ३ लाख ८८ हजार ६८१ रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.अजून ६६२ शेतकऱ्यांचे १० हजार ८६८.४७ क्विंटल हरभऱ्याचे ५ कोटी ६८ लाख ४२ हजार ९८ रुपयाचे चुकारे येणे बाकी आहे.

हरभरा चुकारे अदायगी स्थिती रक्कम (कोटी रुपये)

केंद्र...शेतकरी संख्या...हरभरा क्विंटल...रक्कम

परभणी...९८४...१३६७२...७.१५

जिंतूर...६०६...७४८०...३.९१

बोरी...१५०७...१९२२३...१०.०५

सेलू...१२०४...१४४९५...७.५८

मानवत...२३८४...२८१२४...१४.७०

पाथरी...१४६३...१७९३८...९.३८

सोनपेठ...१०९०...१३५५०...७.०८

पूर्णा...१०७०...१२२०९...६.३८

हिंगोली...१९०८...२६७०१...१३.९६

कनेरगाव...२३३५...४०८५३...२१.३६

कळमनुरी...९०७...१२९५८...६.७७

वारंगा...५१७...७८७५...४.११

वसमत...४१५...६१९५...३.२४

जवळा बाजार...१४५७...२१२१३...११.०९

सेनगाव...७७४...१२२७१...६.४१

साखरा...३८६...५८५०...३.०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com