यवतमाळमध्ये अडीच हजार शेतकऱ्यांचा हरभरा घरातच

शेतकऱ्यांचा वाढता दबाव पाहता हरभरा खरेदीला १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, पुन्हा पोर्टल बंद झाले आहे. अजूनही अडीच हजार शेतकऱ्यांच्या घरांत हरभरा आहे.
यवतमाळमध्ये अडीच हजार शेतकऱ्यांचा हरभरा घरातच
HarbharaAgrowon

यवतमाळ : ‘नाफेड’चे हरभरा खरेदी पोर्टल बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर हरभरा खरेदीचा (Chana Procurement)प्रश्‍न उभा झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोर्टलचे भिजत घोंगडे कायम आहे. अजूनही हरभरा खरेदीबाबत ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर रब्बी हंगामातील हरभरा होता. हमीभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी ‘नाफेड’कडे नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील आठ व विदर्भ को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अखत्यारितील सात अशा १५ खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’ची खरेदी सुरू होती. मात्र, पोर्टल बंद झाल्याने गेल्या आठवड्यापासून हरभरा खरेदी बंद आहे. आठ दिवसांपासून हरभरा खरेदीबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

Harbhara
ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडामध्ये वाढ करणार

सतरा केंद्रांवर दहा हजार ३५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सात हजार २८ शेतकऱ्यांकडून एक लाख १९ हजार ८३६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. ‘नाफेड’चे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी बंद करण्यात आली. शेतकऱ्यांचा वाढता दबाव पाहता हरभरा खरेदीला १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, पुन्हा पोर्टल बंद झाले आहे. अजूनही अडीच हजार शेतकऱ्यांच्या घरांत हरभरा आहे.

एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे पोर्टल बंद करून शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढवीत आहे. शासनाच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

शेतकऱ्यांच्या घरात अजूनही जवळपास ४० हजार क्विंटल शेतमाल शिल्लक असल्याचा अंदाज आहे. पोर्टल बंद झाल्याने खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जुने चुकारे बाकी आहेत. त्यामुळे शेतकरी दोन्हींकडून अडचणीत आले आहेत. म्हणून शासनाने पोर्टल सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com