कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा

मंत्री डॉ. भारती पवार यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस
कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा
OnionAgrowon

नाशिक : कांद्याच्या उत्पादनात (Onion Production) देशाचा जगात दुसरा, तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. चालू वर्षी उत्पादन वाढल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर (Onion Rate) होत होऊन दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका (Financial Loss) बसत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्रालयाने (Union Agriculture Ministry) बाजार हस्तक्षेप योजना (Market Intervention Scheme) लागू करावी, अशी शिफारस आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

सध्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी डॉ. पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत किमान किमतीत समाविष्ट नसलेल्या बागायती आणि नाशीवंत शेतीमालाला संरक्षण दिले जाते. नाशीवंत मालाच्या किमती घसरतात, अशावेळी सरकारकडून ही योजना लागू केली जाते. राज्य सरकारच्या विनंतीवरून संबंधित मालाचे झालेले नुकसान सामाईक केले जाते. केंद्र आणि राज्य सरकार ५० : ५० टक्के आधार देतात. या योजनेत सफरचंद, किंनू संत्रा, लसूण, गालगल, द्राक्षे, मशरूम, लवंग, काळी मिरी, अननस, आले, लाल मिरची, धणे, इसबगोल, चिकोरी, मोहरी, एरंडेल पाम तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. यात कांदा पिकाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली.

राज्यानेही केंद्रास प्रस्ताव द्यावा

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासमवेत डॉ. पवार या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडू नये म्हणून तत्काळ केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस करून बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत समाविष्ट पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश करण्याची मागणी केली आहे. बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या पिकांच्या यादीमध्ये कांद्याचा समावेश करावा. राज्य सरकारला सूचना तसेच आवश्यक निर्देश करावेत, अशी मागणी डॉ. पवार केली आहे. राज्य सरकारने देखील योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ केंद्र शासनास सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com