Future Market:मका, मूग, तुरीच्या किमतींत वाढ

१ ऑगस्टपासून NCDEX मध्ये मका व हळदीचे २० डिसेंबर २०२२ डिलिवरीचे व MCX मध्ये कापसाचे ३१ जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार सुरू होतील.
Future Market
Future MarketAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

देशातील कापसाची (Cotton)आवक ४ फेब्रुवारीपासून उतरत आहे. तसेच हळद (Turmeric), हरभरा व तूर यांचीसुद्धा आवक उतरत आहे. मक्याची (Maize) आवक ३ जूनपासून वाढत आहे. मुगाची आवक ८ जुलैपर्यंत वाढत होती, त्यानंतर ती उतरत आहे. सोयाबीनच्या किमती उतरू लागल्याने आवक १३ मेनंतर वाढली आहे. कांद्याची (Onion) साप्ताहिक आवक २२ एप्रिलनंतर तीन ते चार लाख टनांवर टिकून आहे. टोमॅटोची आवक ६ मेनंतर सतत वाढत आहे.

जुलै महिन्यात मका, मूग व तूर यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हरभरा, सोयाबीन, कांदा व टोमॅटो यांच्या किमतींत कल उतरता होता. १ ऑगस्टपासून NCDEX मध्ये मका व हळदीचे २० डिसेंबर २०२२ डिलिवरीचे व MCX मध्ये कापसाचे ३१ जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार सुरू होतील. या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जून महिन्यात घसरत होते. जुलै महिन्यातसुद्धा ही घसरण चालू आहे. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ३.९ टक्क्यांनी वाढून रु. ४३,१०० वर आले आहेत. ऑगस्ट डिलिव्हरी भाव रु. ४४,९५० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) रु १,६०० वर आले आहेत. यंदा कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जून महिन्यात वाढत होत्या. जुलै महिन्यातसुद्धा त्या वाढत आहेत. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,३०० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (ऑगस्ट डिलिव्हरी) किमती रु. २,३०७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. २,३२८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जूनमध्ये वाढत होत्या. जुलै महिन्यात मात्र त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,७३१ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती जून महिन्यात घसरत होत्या. जुलै महिन्यातसुद्धा त्या सुरुवातीला उतरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,८७० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ०.२ टक्क्याने घसरून रु. ७,६९० वर आल्या आहेत.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत आहेत. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ६,२७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. मुगाची आवक वाढती आहे. विशेषतः मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथील बाजारांत आवक वाढत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) जून महिन्यात उतरत होती. जुलै महिन्यातसुद्धा किमती उतरत आहेत. या सप्ताहात सोयाबीन रु. ६,४५१ वर आले आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) जून महिन्यात वाढत होती. याही महिन्यात किमती वाढत आहेत. तुरीची किमत या सप्ताहात रु. ७,१०७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,३०० होती. या सप्ताहात दर १.३ टक्क्याने घसरून रु. १,२३८ वर आला आहे. कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत आहेत.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती परत घसरू लागल्या आहेत. टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) या आठवड्याअखेर ती १,००० रु. पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक जून व जुलै महिन्यात वाढती आहे. यातील मुख्य आवक कर्नाटक (४० टक्के) मधील आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांचा सहभाग प्रत्येकी १० टक्के आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com