खतपुरवठ्यासाठी मालधक्के वाढवले

राज्यात ६३ ठिकाणी होणार खतांची चढ-उतार
खतपुरवठ्यासाठी मालधक्के वाढवले
FertilizerAgrowon

पुणे ः शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा (Fertilizer Supply) जलद होण्यासाठी मालधक्क्यांची (Maldhakka) संख्या वाढविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात आता खतांची (Fertilizer) चढ-उतार करण्यासाठी एकूण ६३ मालधक्के उपलब्ध असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खरिपासाठी एकूण ४५ लाख टनाच्या आसपास खतांचा पुरवठा (Fertilizer Rate) राज्यभर होणार आहे. बंदरांपासून तसेच देशांतर्गत निर्मिती प्रकल्पांपासून यात बहुतांश खते रेल्वेने राज्याच्या विविध भागांत पोहोचविली जातात. आतापर्यंत राज्यात खतांच्या मालधक्क्यांची संख्या (फर्टिलायझर्स रेक पॉइंट्‍स) केवळ ६१ होती. लातूर व अमरावती भागांसाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र तुलनेत मालधक्क्यांची संख्या कमी आहे, असे राज्य शासनाने केंद्राच्या निदर्शनास आणले होते.

राज्यात दोन नव्या मालधक्क्यांना मंजुरी
नव्या मालधक्क्यांची मागणी इतर राज्यांमधून देखील केंद्राकडे आली होती. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास खरिपात रासायनिक खतांच्या वाहतुकीत समस्या उद्‍भवू शकतात, असे लक्षात आले होते. त्यामुळे केंद्रीय खते मंत्रालयाने विविध राज्यांमध्ये १३ नवे मालधक्के मंजूर केले. यात लातूर जिल्ह्यात उदगीर व अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजारचा समावेश आहे. त्यामुळे खत कंपन्यांना रेल्वे वाघिणींद्वारे लातूर व अमरावती भागांसाठी जादा खते पुरवता येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील खतांचे मालधक्के
जिल्हा...रेल्वे मालधक्क्याचे ठिकाण
नगर... नगर, बेलापूर, कोपरगाव
अकोला...अकोला
अमरावती...अमरावती, बडनेरा, धामणगाव, चांदूरबाजार
औरंगाबाद...औरंगाबाद
बीड...परळी वैजनाथ
बुलडाणा...खामगाव, मलकापूर
चंद्रपूर...चंद्रपूर, ताडळी, मुल
धुळे...दोंडाईचा, धुळे
गडचिरोली...वडसा
गोंदिया...गोंदिया
जळगाव...अमळनेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, भुसावळ
जालना...जालना
कोल्हापूर...गुळमार्केट
लातूर...उदगीर, लातूर
नागपूर...कन्हान, बुटीबोरी, नागपूर, बह्णाणपूर, चिकनी रोड, गोधनी
नांदेड...मालटेकडी
नाशिक...नांदगाव, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, निफाड
नंदूरबार...नंदूरबार
उस्मानाबाद...उस्मानाबाद
परभणी...परभणी
हिंगोली...हिंगोली
पुणे...बारामती, भिगवण, सासवड रोड
रत्नागिरी...रत्नागिरी
सांगली...मिरज, सांगली
सातारा...कराड, सातारा
सोलापूर...सोलापूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, वाडी
वर्धा...वर्धा, हिंगणघाट
वाशीम...वाशीम
यवतमाळ...कायर, पिंपळखुटी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com