Soybean Market : सोयाबीन, हरभऱ्याची वाढती आवक

हरभऱ्याची आवक गेल्या सप्ताहापासून वाढत आहे. ती पुढील काही सप्ताहात वाढती राहील. कांद्याची आवकसुद्धा आता वाढू लागली आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

Soybean Market Update या महिन्यात मूग, मका (Maize), हळद (turmeric) व टोमॅटो (Tomato) यांची आवक उतरती होत आहे. सोयाबीनची आवकसुद्धा (Soybean Arrival) कमी होत होती; पण गेल्या दोन सप्ताहात ती, किमतीही कमी होत असल्याने, वाढत आहे. कापूस व तूर यांची आवक वाढत आहे.

हरभऱ्याची आवक गेल्या सप्ताहापासून वाढत आहे. ती पुढील काही सप्ताहात वाढती राहील. कांद्याची आवकसुद्धा आता वाढू लागली आहे.

या महिन्यात कापूस, मका, हळद, हरभरा, सोयाबीन व कांदा यांच्या किमती कमी होत आहेत. कांदा रबीचा हंगाम अजून सुरु झाला नाही; त्यामुळे कांदा किमतीतील घसरण चिंताजनक आहे.

२४ फेब्रुवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेतः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी घसरून प्रति खंडी रु. ६२,६८० वर आले. एप्रिल फ्युचर्स भाव रु. ६३,७४० वर आले तर जून फ्युचर्स रु. ६४,००० वर आले.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.४ टक्क्यांनी घसरून रु १,५७२ वर आले आहेत. कापसाचा हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहे. कापसाची आवक अजून वाढती आहे.

Chana Market
Soybean Rate : पुढील आठवड्यात सोयाबीन वाढेल का?

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१०० वर आल्या होत्या.

या सप्ताहात त्या याच पातळीवर स्थिर आहेत. फ्युचर्स (मार्च डिलिवरी) किमती रु. २,११० वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती रु. २,१३४ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. मक्याची आवक घसरती आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ६,९९० वर आल्या होत्या.

या सप्ताहातसुद्धा त्या ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,९८५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. ७,०९० वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती रु. ७,१८२ वर आल्या आहेत. आवक हळूहळू वाढत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक गेल्या तीन आठवड्यांत वाढू लागली आहे.

मूग

मुगाच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,१०० वर आली होती. या सप्ताहात ती १.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,००० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती जानेवारी महिन्यात कमी होत होत्या. या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.६ टक्क्यांनी घसरून रु. ५,५३० वर आली. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होती; पण गेल्या दोन आठवड्यांत ती वाढली आहे.

Chana Market
Soybean Market : सोयाबीन दर सुधारण्यास पोषक स्थिती

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,३४० वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. ७५९ होती; या सप्ताहात ती घसरून रु. ६४१ वर आली आहे. आवक वाढत आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ९६७ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. १,००० वर आली आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com