खाद्यतेल आयातीचा खर्च पोचणार दीड लाख कोटींवर

भारत जगात खाद्यतेल आयात करणार सर्वांत मोठा देश आहे. भारताला दरवर्षी साधारपणे २२० ते २३५ लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी जवळपास ६५ टक्क्यांची आयात केली जाते.
Edible Oil
Edible Oilagrowon

पुणेः कोरोनानंतर खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती. मात्र युध्दामुळे दराला फोडणीच मिळाली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा खाद्यतेल आयात खर्च वाढणार आहे. भारताला २०२२-२३ या आर्थिक वर्षात दीड लाख कोटी रुपये खाद्यतेल आयातीवर मोजावे लागतील, असे जाणकारांनी सांगितले.


भारत जगात खाद्यतेल आयात करणार सर्वांत मोठा देश आहे. भारताला दरवर्षी साधारपणे २२० ते २३५ लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी जवळपास ६५ टक्क्यांची आयात केली जाते. भारताची आयात जवळपास १३० ते १५० लाख टनांच्या दरम्यान असते. मागील दोन वर्षांची १३२ लाख टन होती. मात्र आयातीवरील खर्च वाढला. २०२०-२१ मध्ये खाद्यतेल आयातीवरील खर्च ७२ हजार कोटींवर झाला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने आयात खर्चात २०२१-२२ मध्ये वाढ झाली. या वर्षात १३२ लाख टन आयातीसाठी तब्बल १ लाख १७ हजार कोटी रुपये मोजावे लागले. यंदा तर मागील वर्षीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर आणखी वाढले.

रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे सूर्यफूल तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. सूर्यफूल तेलाचे दर १५०० डाॅलर प्रतिटनावरून २०५० रुपयांवर पोचले. मार्च महिन्यात हा दर २२०० डाॅलरवर पोचला होता. तर सोयाबीनचे दरात टनामागे ३०० डाॅलरची वाढ झाली. सोयाबीनचे दर १५०० डाॅलरवरून १८०० डाॅलरवपर्यंत वाढले. या देन्ही तेलांचे दर वाढल्यानंतर पामतेलाच्या दराला झळाळी मिळाली. पामतेलाचे दर १४०० डाॅलरवर होते. ते १७०० डाॅलरवर पोचले. खाद्यतेलामध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या तेलांची टंचाई निर्माण झाली.
………..
एप्रिलचे आयात करार
जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारताचा आयात खर्चही यंदा वाढेल. २०२२-२३ चे आर्थिक वर्ष नुकतेच सुरु झाले. एप्रिल महिन्यासाठी आयात करार सुरु आहेत. भारताने एप्रिलच्या शिपमेंटसाठी रशियासोबत ४५ हजार टन आणि अर्जेंटीनातून २० हजार टन सूर्यफूल तेल आयातीचे करार केले. हे करार २१०० डाॅलर प्रतिटनाने झाले.

असा वाढेल खर्च
मागील वर्षी भारताचा खाद्यतेल आयातीवरील खर्च १८०० कोटी डाॅलरवर झाला होता. भारतीय रुपयात १ लाख १७ कोटी अंदाजे खर्च गृहित धरण्यात आला. मात्र यंदा आयात खर्च २००० कोटी डाॅलरवर होण्याची शक्यता आहे. डाॅलरचा दर ७५.९० रुपये गृहित धरल्यास हा आकडा १ लाख ५० हजार ८०० कोटी रुपये होते. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीच्या तुलने ३४ हजार ८०० कोटी रुपये जास्त खर्च होणार आहे, असे जाणकारांनी सांगितले.
……
प्रतिक्रिया
मागील आर्थिक वर्षापासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र रशिया आणि युक्रेन युध्दामुळे दर आणखी सुधारले. त्यामुळे आयात खर्च वाढत आहे. सूर्यफूल तेल उपलब्धतेत अडचणी आहेत. मात्र आयातीचे पर्याय शोधले जात आहेत.
- प्रमोद बंसल, तेलबिया प्रक्रियादार, उज्जैन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com