Corn Export : भारतीय मक्याला आफ्रिकेचीही पसंती; आयातीचा विचार

आंतरराष्ट्रीय पातळीवर यंदा मका उत्पादन घटले. रशिया आण युक्रेन युध्दामुळे या दोन्ही देशांमधील मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
Corn Export
Corn Export Agrowon

Maize Price : चालू हंगामात देशातून मका निर्यात (Maize Export) वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मका (Maka) महागल्याने भारतीय मकाला पसंती मिळाली. सध्या भारतातून मका आयातीचा खर्च कमी येत आहे.

त्यामुळेच आग्नेय आशियातील देश आणि आखाती देशांनी मका आयात केला. तर आफ्रिकेतील देशही भारतीय मका आयातीचा विचार करत आहेत, असे निर्यातदारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर यंदा मका उत्पादन घटले. रशिया आण युक्रेन युध्दामुळे या दोन्ही देशांमधील मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

याचा परिणाम जागतिक मका उत्पादनावर झाला. इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसील आणि एफएओच्या मते जगात यंदा ११ हजार ५३० टन मका उत्पादन होईल. मागील हंगामातील उत्पादन १२ हजार २०० टन होतं. जागतिक पातळीवर मका उत्पादन घटल्यानं दरही वाढले.

Corn Export
Corn Market: जागतिक मका उत्पादन घटल्यानं दर चांगले | Agrowon | ॲग्रोवन

भारतात मात्र यंदा उत्पादनवाढीचा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. खरिपातील उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. देशातील मका उत्पादन यंदा ३४६ लाख टनांवर पोचेल. मागील हंगामात ३३२ लाख टन उत्पादन झाले होते.

तर खरिपातील उत्पादन मागील हंगामातील २३१ लाख टनांवरून २३८ लाख टनांपर्यंत वाढेल, असाही अंदाज सरकारने व्यक्त केला.

असे आहेत मक्याचे दर

भारतात खरिपातील मका उत्पादन वाढले. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर वाढून मागणी चांगली होती. सध्या अमेरिकेचा मका ३०० डाॅलर प्रतिटनानं मिळतो. तर अर्जेंटीना ३१४ डाॅलरने आणि ब्राझील ३१० डाॅलर प्रतिटनानं मका निर्यात करत आहे.

तर भारताचा मकाही ३०८ ते ३११ डाॅलर प्रतिटनाच्या दरम्यान आहे. पण भारतातून मका आयातीसाठी वाहतुक खर्च कमी लागतो. त्यामुळं व्हिएतनाम आणि मलेशियासह इतर आग्नेय आशियातील देश आणि आखाती देशांमधून मक्याला मागणी वाढलेली आहे.

आफ्रिकेतून विचारणा

भारतातून आयातीला खर्च कमी लागत असल्यानं आफ्रिकेतूनही मागणी येत असल्याचं सांगितलं जातं. पण खरेदीसाठी प्रत्यक्ष व्यवहार झाले नाहीत, असं निर्यातदारांनी सांगितलं. त्यातच सध्या खरिपातील मका संपत आला. बाजारातील मका आवकही घटली आहे. त्यामुळे निर्यात काहीशी कमी झाली.

रब्बीतील मक्यालाही मागणी राहील

रब्बी हंगामातील मका आवक एप्रिलपासून वाढेल. यंदा रब्बीतील मका उत्पादन १०७ लाख टनांवर राहण्याचा अंदाज आहे. सध्या मक्याला निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. देशातही वापर वाढला. त्यामुळे बाजारातील दर २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता रब्बीतील मका पिकालाही मागणी चांगली राहू शकते. त्यामुळं मक्याची आवक वाढली तरी सध्याचे दर टिकू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com