भारतातील रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर
Silk ProductionAgrowon

भारतातील रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर

२०२०-२१ मध्ये रेशीम उत्पादनांच्या निर्यातीने सहा वर्षांतील तळ गाठला होता. २०२१-२२ मध्ये मात्र निर्यातीची स्थिती सुधारली. यावर्षी निर्यातीच्या माध्यमातून सुमारे १९२६ कोटी रूपये मिळाले.

गेल्या सहा वर्षांतील घसरणीनंतर भारतातील रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर येऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीचे उत्पन्न ३६ टक्के वाढले आहे. अमेरिका आणि युरोपमधून रेशीम गालिचे आणि तयार कपड्यांना मागणी वाढल्यामुळे निर्यातीत सुधारणा झाली आहे.

२०२०-२१ मध्ये रेशीम उत्पादनांच्या निर्यातीने सहा वर्षांतील तळ गाठला होता. २०२१-२२ मध्ये मात्र निर्यातीची स्थिती सुधारली. यावर्षी निर्यातीच्या माध्यमातून सुमारे १९२६ कोटी रूपये मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ३६ टक्के वाढ झाली आहे. डॉलरच्या भाषेत उत्पन्नातील वाढ ३५ टक्के भरली.

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे विकसित देशांकडून रेशीम उत्पादनांची मागणी घटली होती. यंदा मात्र हे चित्र बदलले असून रेशीम उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपिय देशांमधून रेशीम गालिचे, तयार कपड्यांची खरेदी वाढली. येत्या आर्थिक वर्षातही ही मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.

सेंट्रल सिल्क बोर्डाच्या (CSB) आकडेवारीनुसार २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात रेशीम गालिच्यांच्या निर्यातीचे करार ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर तयार रेशमी कपड्यांच्या निर्यातीत २६ टक्के वाढ झाली आहे. देशात २०२१-२२ मध्ये रेशीम उत्पादन ३.४ टक्के वाढले.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेशीम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झालेली असली तरी २०१५-१६ आणि २०१६-१७ च्या तुलनेत ही निर्यात खूपच कमी आहे. २०१५-१६ मध्ये रेशीम उत्पादनांच्या निर्यातीतून सुमारे २४९६ कोटी रूपये मिळाले होते. तर २०१६-१७ मध्ये सुमारे २०९३ कोटी रूपये मिळाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com