इराणकडून खरेदी मंदावल्याने भारताच्या बासमती निर्यातीत घट

भारताच्या बासमतीचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या इराणकडून होणारी खरेदी यंदा मंदावल्यामुळे भारताची निर्यात घसरली आहे.
Basamati Rice Export
Basamati Rice Export

भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा (Basamati Rice) खरेदीदार असलेल्या इराणकडून (Iran Basamati Rice) खरेदी मंदावली आहे. त्यामुळे भारताची बासमती तांदळाची निर्यात (Basamati Rice Export) गेल्या वर्षीच्या तुलनेत एक पंचमांश टक्क्यांनी घसरून २०२१ मध्ये चार वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. इराणकडील रुपयाचा साठा कमी झाल्यामुळे खरेदी मंदावल्याचे अधिकारी आणि उद्योगातील सुत्रांचे म्हणण आहे.  भारताचा इराणशी असणारा व्यवहार हा भारतीय रुपयांत होतो. इराणच्या रुपयाचा साठा कमी झाल्यामुळे इराणकडून होणारी खरेदी मंदावल्याचे या क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, भारताची बासमती तांदळाची निर्यात (Basamati Rice Export ) २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटली असून ४० लाख टन झाली आहे. भारताकडून इराणकडे होणारी निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी घटून आठ लाख ३४ हजार ४५८ टन झाल्याचे डेटावरून लक्षात येते.

हेही वाचा - चार गायी विकून मी चार एकर शेती घेतली, पण... गेल्या वर्षी भारतीय रुपयाचा साठा कमी झाल्यानंतर इराण काही महिने बाजारात सक्रिय नसल्याची माहिती मुंबई येथील ग्लोबल ट्रेडींग हाऊसच्या (Global Trading House) डिलरने दिली असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. इराणने पूर्वी भारताला रुपयाच्या बदल्यात तेल विकण्याचा करार केला होता, ज्याच्या मोबदल्यात इराण भारताकडून अन्नधान्य उत्पादनांची आयात करत होता.

हेही वाचा - २०२४ पर्यंत डिझेलमुक्त शेती; केंद्र सरकारचं उद्दिष्ट   अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून इंधन आयात (Crude Import) करणे थांबवले होते. मात्र इराणने भारताकडून अन्नधान्य उत्पादनांची आयात सुरूच ठेवलेली आहे. इंधनापोटी इराणला मिळणाऱ्या भारतीय चलनाचा प्रवाह खंडित झाल्यामुळे त्यांच्याकडील भारतीय चलनाचा साठा संपुष्टात आला. २०२१ च्या मध्यात निर्यात मंदावली होती. परंतु गेल्या दोन तीन महिन्यात इराण, सौदी अरेबिया आणि इतर प्रमुख खरेदीदारांकडून खरेदी वाढली आहे, असे ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे (All India Rice Exporters Association) माजी अध्यक्ष विजय सेटीया (Vijay Setia) यांनी म्हटले आहे.   बासमती तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेला भारत आफ्रिकन देशांना बिगर बासमती तांदूळ आणि उच्च प्रतिच्या बासमती तांदळाची आखाती देशांना निर्यात करतो. गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये देशाची एकूण तांदूळ निर्याती जवळपास ४६ टक्क्यांनी वाढून २१४ लाख टन झाली आहे. ज्यामध्ये बांगलादेश, चीन आणि व्हिएतनाममधून विक्रमी खरेदी झाली आहे. ऐन कापणीच्या काळातील अवकाळी पाऊस आणि घटलेले पेरणी क्षेत्र यामुळे २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये बासमतीचे उत्पादन १५ टक्के कमी झाल्याचे सेटीया म्हणाले. "बासमती तांदळाच्या निर्यातीसाठीचा खर्च २० टक्क्यांनी वाढला आहे. कारण उत्पादन कमी आहे परंतु तरीही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मागणी मजबूत आहे, असे सेटीया म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com