Palm Oil Import : भारताची पामतेल आयात १६ टक्क्यांनी वाढणार

पामतेलाचे दर मागील चार महिन्यांपासून काहीसे वाढले आहेत. पण भारताच्या खेरदीमुळे त्यात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Palm Oil Import
Palm Oil ImportAgrowon

Oil News : भारताची खाद्यतेल आयात (Edible Oil Import) यंदा वाढण्याचा अंदाज आहे. यात पामतेलाची आयात यंदा १६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून सोयातेल आयात घटण्याची शक्यता आहे. तर सूर्यफुल तेल आयातही वाढण्याचा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला.

भारतात पामतेल आयात वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर सुधारु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

जागतिक पातळीवर खाद्यतेल आयातीत भारत आघाडीवर आहे. भारत दरवर्षी १३० ते १५० लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेल आयात करतो. भारताच्या आयातीत पामतेलाचा वाटा मोठा असतो. भारत सरासरी ८० ते ८५ लाख टन पामतेल आयात करतो.

Palm Oil Import
Palm oil : भारत पामतेल आयातीवरील शुल्क वाढविणार

पण यंदा पामतेल आयात १६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. चालू २०२२-२३ च्या तेल विपणन वर्षात (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) जवळपास ९२ लाख टन पामतले आयात होण्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर पामतेलाची एवढी आयात पहिल्यांदाच होणार आहे, असे आयातदारांनी सांगितल्याचे राॅयटर्सने म्हटले आहे.

दोन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर कमी झाले. त्यामुळे भारताची आयात वाढण्याचा अंदाज आहे. भारताने पामतेल आयात वाढविल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात दराला आधार मिळू शकतो.

पामतेलाचे दर मागील चार महिन्यांपासून काहीसे वाढले आहेत. पण भारताच्या खेरदीमुळे त्यात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चालू तेल विपणन वर्षात पहिल्या चार महिन्यांमध्ये अर्थात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पामतेल आयात तब्बल ७४ टक्क्यांनी वाढली. या चार महिन्यांमध्ये जवळपास ३७ लाख टन पामतेल आयात झाली होती. भारत पामतेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून करतो. तर सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून होते. सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेनमधून मिळते.

खाद्यतेल आयात ३ लाख टनांनी वाढणार

भारताची खाद्यतेल आयात गेल्या हंगामात १४० लाख ७० हजार टनांवर झाली होती. मात्र यंदा खाद्यतेल आयात १४३ लाख ८० हजार टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. मात्र सोयाबीन तेल आयात मागीलवर्षीच्या ४० लाख ५० हजार टनांवरून यंदा ३१ लाख ६० हजार टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.

तर सूर्यफुल तेल आयात मागीलवर्षीच्या १९ लाख ३० हजार टनांवनरून यंदा २० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे, असे इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितले.

Palm Oil Import
Soybean Market : सोयाबीन बाजाराला मिळू शकतो खाद्यतेल दरवाढीचा आधार
कोरोनामुळे भारताचा खाद्यतेल वापर सलग दोन वर्षे घटला होता. पण यंदा खाद्यतेलाचा वापर ५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच खाद्यतेल वाहतुकीतील अडचणी दूर झाल्या आहेत. दरही कमी झाले आहेत. त्यामुळं पामतेल आयात वाढण्याचा अंदाज आहे. यातून वाढलेली मागणी पूर्ण होईल.
सुधाकर देसाई, अध्यक्ष, इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com