भारताच्या मोहरी उत्पादनात वाढ :युएसडीए

२०२१ च्या आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन १०.२१ दशलक्ष टन होते. चालू आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन ११.४६ दशलक्ष टनांवर जाईल, असा उद्योग आणि व्यापारी क्षेत्रातील सूत्रांचा अंदाज आहे.
भारताच्या मोहरी उत्पादनात वाढ :युएसडीए
MustardAgrowon

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मोहरीची भावपातळी वाढल्याने मोहरी उत्पादक देशातील मोहरी लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. २०२१-२०२२ मध्ये जगातील मोहरीचे उत्पादन ७१.३८ दशलक्ष टन होईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA- यूएसडीए) वर्तवला. गेल्या महिन्यात त्यात २ लाख ३ हजार टनांची भर टाकण्यात आली. भारतातील मोहरी उत्पादनातील वाढीच्या शक्यतेमुळे जागतिक उत्पादनाच्या अंदाजात ही सुधारणा करण्यात आली.

भारतात ११ दशलक्ष टन मोहरी उत्पादनाचा कयास वर्तवण्यात आला. लागवडीखालील क्षेत्र व वाढत्या उत्पादनाची शक्यता लक्षात घेता अंदाजात गेल्या महिन्याच्या तुलनेत २ लाख टनांची भर घालण्यात आली. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन १०.२१ दशलक्ष टन होते. चालू आर्थिक वर्षात भारताचे मोहरी उत्पादन ११.४६ दशलक्ष टनांवर जाईल, असा उद्योग आणि व्यापारी क्षेत्रातील सूत्रांचा अंदाज आहे. येत्या काही आठवड्यांत भारतीय बाजारातील मोहरी आवकेचा भर ओसरेल.

युरोपियन युनियनने ऑस्ट्रेलियातील मोहरी उत्पादनाच्या अंदाजात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या महिन्याच्या सुधारित अंदाजानुसार ऑस्ट्रेलियातील मोहरी उत्पादन ५.४ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे, जे यापूर्वीच्या अंदाजापेक्षा ७ लाख टनांनी अधिक आहे. भावपातळी वाढल्याने ऑस्ट्रेलियातील मोहरी लागवडीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे युएसडीएने (USDA) जागतिक मोहरी उत्पादनाचा अंदाज वाढवला आहे.

युरोपियन युनियनच्या मोहरी उत्पादनाच्या अंदाजात या महिन्यात २.५ लाख टनांची कपात करण्यात आली. एकरी उत्पादन घटल्याने ते १८.२५ दशलक्ष टनांवर आणण्यात आले. मे महिन्यातील प्रतिकूल हवामानामुळे फ्रान्समधील मोहरी उत्पादनातील घटीचा आकडा हेक्टरी ३.१९ टनांवरून ३.१५ टनांवर आला.

युरोपियन युनियनने आपल्या मोहरी उत्पादनात घट होणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी अमेरिकेने आपल्या अंदाजात बदल केलेला नाही. अमेरिकेच्या कृषी विभागाने युरोपियन युनियनमधील उत्पादनाचा अंदाज २२.५ दशलक्ष टनांवर ठेवला.

युरोपियन युनियनकडून केल्या जाणाऱ्या मोहरी आयातीच्या प्रमाणावरून अमेरिकेने हा अंदाज बांधला. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात युरोपियन युनियनकडून ५.६ दशलक्ष टन मोहरीची आयात केली जाईल, अशी अमेरिकेच्या कृषी विभागाची अपेक्षा आहे. चालू वर्षाच्या अखेरीस युरोपियन युनियनकडे ६ लाख ९१ हजार टनांचा मोहरी साठा उपलब्ध असेल, असा अंदाज आहे. २०२१-२०२२ मध्ये युरोपियन युनियनकडे वर्षाच्या शेवटी सुमारे ३ लाख ६६ हजार टन एवढाच मोहरी साठा उपलब्ध होता. हा त्यांचा आजवरील नीचांकी साठा होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com