Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा

उत्तर भारतातील कापूस पिकाला (Cotton Crop) पाऊस आणि कीड-रोगाचा फटका बसतोय, अशा बातम्या येत आहेत. शेतकऱ्यांनी पिकाचं (Crop Damage) नुकसान झाल्याचं सांगितलंय.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

हरभऱ्याचे दर बुधवारी काहीसे नरमले. सणासुदीच्या दिवसांत हरभऱ्याची मागणी वाढून दर सुधारण्याची अपेक्षा होती. मात्र केद्र सरकारच्या निर्णयामुळे दर दबावाखाली आलेत. सरकारने १५ लाख टन हरभरा राज्यांना ८ रुपये किलोने देण्याचा निर्णय घेतलाय. हा हरभरा रेशनसह कल्याणकारी योजनांमधून वाटप केला जाणार आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील मागणी घटण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने हा निर्णय घेतल्यानंतर बाजारात हरभऱ्याचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत नरमल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर कायम राहण्याचा अंदाज आहे.

उडीद तेजीत राहण्याचा अंदाज

देशात सध्या उडादचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळं उडदाचे दर तेजीत आहेत. सणांच्या काळात उडीद डाळ आणखी महाग होण्याची शक्यता आहे. यंदा उडदाची लागवडही कमी झाली. त्यातच पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं नाफेडने उडदाचा संरक्षित साठा करण्यावर भर दिलाय. त्यासाठी २५ हजार ते ३५ हजार टन आयात उडदाची नाफेड खरेदी करणार आहे. त्यासाठी नाफेडने निविदाही मागवल्या. परंतु आयात उडदाचे दरही प्रतिक्विंटल ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातही उडीद ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. नवीन उडदालाही यंदा चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

काकडीचे दर स्थिर राहण्याची शक्यता

यंदा काकडीला चांगला दर मिळतोय. यंदा पावसामुळे काकडीची लागवड कमी झालीय. दरवर्षी सप्टेंबर आणि आक्टोबर महिन्यात काकडीची आवक जास्त राहून दर कमी असतात. मात्र यंदा काकडीला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात १२०० ते २५०० रुपये क्विंटल दराने काकडी विकली जातेय. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काकडीचा हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे. तर पुरवठा मर्यादीत झाल्यास काकडीला २००० ते २७०० रुपये सुद्धा दर मिळू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

टोमॅटोचा बाजार अद्यापही दबावातच

टोमॅटोचा दर सध्या दबावात आहे. यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं सध्या बाजारात चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटो आवक कमी आहे. परंतु उठाव नसल्यामुळे टोमॅटोचे दर नरमलेले आहेत. सध्या राज्यात टोमॅटोला सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपये ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हा दर परवडत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. तर पुढील काळात बाजारातील आवक मंदावल्यानंतर टोमॅटो दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

देशात यंदा कापसाची लागवड (Cotton Cultivation) काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला.

उत्तर भारतातील कापूस पिकाला (Cotton Crop) पाऊस आणि कीड-रोगाचा फटका बसतोय, अशा बातम्या येत आहेत. शेतकऱ्यांनी पिकाचं नुकसान झाल्याचं सांगितलंय. पंजाब आणि हरियाणातील कृषी विभागांनीही त्याला दुजोरा दिलाय. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादन यंदा कमी राहील, असा अंदाज व्यक्त होतोय.

मात्र काॅटन असोसिएशन लिमिटेड या भटींडा येथील संघटनेनं मात्र अजब अंदाज जाहीर केलाय. यंदा उत्तर भारतातील कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. या संघटनेच्या मते पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पिकाची स्थिती चांगली असून ५८ लाख गाठी कापूस उत्पादन होईल. एक कापूस गाठ १७० किलोची असते. काही भागांत नव्या कापसाची आवकही सुरु झाली.

या कापसाची गुणवत्ताही चांगली असल्याचं या संघटनेनं म्हटलंय. हरियाणातील कापूस उत्पादन मागील वर्षीच्या १५ लाख गाठींवरून १९ लाख गाठींवर पोचेल, तर पंजाबमधील उत्पादन मात्र ५० हजार गाठींनी कमी राहील आणि राजस्थानमधील उत्पादन २६ लाख गाठींवरून ३३ लाख गाठींपर्यंत वाढेल, असा अंदाज या संघटनेने बांधला आहे.

विशेष म्हणजे या तीनही राज्यांमध्ये कापूस लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली नाही. मात्र उत्पादकता अधिक राहून उत्पादन वाढेल, असा संघटनेचा कयास आहे. पण जाणकारांना हा अंदाज मान्य नाही. या तीनही राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस, पांढरी माशी, गुलाबी बोंडअळीचा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादन कमीच राहील. कापसाचे दर तेजीत राहतील. यंदा कपसाला सरासरी ८ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com