मराठवड्यातील बाजारात सोयाबीन आवक स्थिर

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
मराठवड्यातील बाजारात सोयाबीन
आवक स्थिर
soybeanagrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या तुळजापूर बाजारामध्ये आज ४ जुने रोजी 185 क्विंटल सोयाबीन(soybean) विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6000 रुपये ते कमाल 6200 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6100 रुपयांनी झालेत. वसमत बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती.तिकडे बीड बाजारात 62 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 4801तर कमाल 6155 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6002 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे लातूर बाजारात किमान 6071 रुपये तर कमाल 6520 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6440 होता.

soybean
खरीपात बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड कशी करावी ?

अकोला बाजारात सोयाबीनची आज 4 जून रोजी 1220 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5500 रुपये तर कमाल 6360 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर(rate) 6100 रुपयांवर होता. अकोला बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.चिखली बाजारात सोयाबीनची 788 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5950 रुपये होता. तर कमाल भाव 7076 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6513 चा भाव मिळालाय.नागपूर बाजारात सोयाबीनला किमान 5500 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6400 रुपयाने झाले. सरासरी दर 6175 रुपये मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com