कृषी केंद्र चालकांचा बंद अखेर मागे

अवैध कापूस बियाणे विक्री रोखण्याचे आश्‍वासन
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

जळगाव ः अवैध कापूस बियाणे विक्री रोखण्यात येईल, यासह १५ मेपासून कापूस बियाणे विक्रीसंबंधीच्या मागणीचा पुढील हंगामात सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी केंद्रचालकांनी शनिवारी (ता.१५) पुकारलेला बंद मागे घेतला आहे.

अवैध कापूस बियाणे विक्री जिल्ह्यात मेमध्ये सर्रास केली जाते. यातच शासनाने गुलाबी बोंड अळी रोखण्यासह इतर खबरदारीचे उपाय म्हणून १ जूनपासून कापूस बियाणे विक्रीचे आदेश दिले आहेत. पण शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातमधून मेच्या मध्यात बियाणे आणतात. बियाण्याचा काळाबाजार होतो. यामुळे कृषी केंद्रांमध्ये कापूस बियाणे पडून राहते. कृषी केंद्रचालकांचे नुकसान होते. तसेच अवैध कापूस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांनाही फटका बसतो. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी केंद्रचालकांनी शनिवारी (ता.१५) बंद पुकारला होता. हा बंद जळगाव येथील जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाऱ्यांशी झालेल्या कृषी केंद्रचालकांच्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आल्याची माहिती रावेर तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे सुनील कोंडे यांनी दिली.

या चर्चेत रावेर, यावल तालुक्यातील कृषी केंद्रचालक सहभागी झाले. पुढील हंगामात १५ मेपासून जिल्ह्यात अधिकृतपणे कापूस बियाणे विक्रीसंबंधी परवानगी देण्याबाबत विचार केला जाईल. या मागण्या राज्य शासनाकडे पोचविल्या जातील. त्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे आश्वासन कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिले, असे ‘असोसिएशन’तर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com