Sugar Export: साखरनिर्यातीला परवानगी न मिळाल्यास मोठे नुकसान?

साखर हंगाम ( २०२२- २३) मध्ये भारतामध्ये ३६० ते ३६५ लाख टन साखर उत्पादन (Sugar Production) होण्याचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रात १४५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकमध्येही जादा साखर उत्पादनाची (Sugar Production)अपेक्षा आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : येणारा साखर हंगाम (Sugar Season) अनेक राज्यांना आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. विशेष करून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना यंदाही साखरनिर्यातीची अधिक संधी आहे. केंद्राने निर्यातीला प्रतिबंध केला, तर बहुतांशी करून याच राज्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या तुलनेत उत्तर प्रदेशला कमी फटका बसू शकतो, असे साखर उद्योगातील (Sugar Industry) सूत्रांचे म्हणणे आहे.

साखर हंगाम ( २०२२- २३) मध्ये भारतामध्ये ३६० ते ३६५ लाख टन साखर उत्पादन (Sugar Production) होण्याचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रात १४५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकमध्येही जादा साखर उत्पादनाची (Sugar Production)अपेक्षा आहे. या मागील हंगाम (२०२१-२२) मध्ये ‘ओपन जनरल लायसन’ या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी सबसिडीशिवाय साखरनिर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली. त्या संधीचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्र व कर्नाटकमधील साखर कारखानदारांनी घेतला.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून बंदरापर्यंत साखर वाहतुकीचा खर्च कमी आहे. उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांना देशांतर्गत बाजारात महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील साखरेपेक्षा जादा दर मिळतो. यामुळे उत्तर प्रदेशातील कारखाने निर्यातीपेक्षा स्थानिक भागातील विक्रीलाच अधिक महत्त्व देतात. गेल्या वर्षी मात्र महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखान्यांनी निर्यातीला अधिक महत्त्व देऊन निर्यातीतून अपेक्षित रक्कम मिळवली. या तुलनेत उत्तर प्रदेशांमधून निर्यात कमी राहिली.

देशांतर्गत बाजारात साखर किमती वाढतील, या भीतीमुळे केंद्राने गेल्या महिन्यापासून गतीने होणारी निर्यात (Sugar Export) थांबवली आहे. अशीच प्रक्रिया पुढील हंगामात सुरू राहिल्यास त्याचा मोठा फटका महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखान्यांना बसू शकतो, अशी भीती साखर उद्योगाला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या साखर निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक साखर ही महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखान्यांनी निर्यात (Sugar Export) केली. याचा सकारात्मक परिणाम कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यावरही झाला. देशांतर्गत बाजारपेठेतील रिलीज मेकॅनिझमचा विचार करता देशांतर्गत वार्षिक खप हा २६८ लक्ष मेट्रिक टन आहे. या हंगामात महाराष्ट्रातील बरेच कारखानदार त्यांच्या मासिक कोट्यातून मागणी कमी आहे. त्यामुळे साखर विक्री करू शकले नाहीत.

केंद्राने कारखान्याकडून योग्य डेटा घ्यावा, अशी मागणी साखर उद्योगाची आहे. केंद्राने कारखान्याकडून योग्य डेटा मिळविला असता तर आज ११० लाख टनांपर्यंत साखर निर्यात झाली असती. परंतु सरकारने गडबड करत निर्यातीवर अंकुश ठेवला. तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील कारखानदारांकडून जूनमध्ये विशेष गाळप हंगाम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील तसेच उत्तर कर्नाटक, गुजरातमध्ये ऑक्टोबरमध्ये नवीन हंगाम २२-२३ करिता गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे केंद्राला अपेक्षित पुरेसा साखर साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

...अशा आहेत साखर उद्योगाच्या अपेक्षा

- ‘ओपन जनरल लायसन’अंतर्गत साखर निर्यातीस परवानगी देताना कारखानानिहाय कोटाप्रणाली अवलंबू नये. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांवर अन्याय होईल.

- हंगाम २२-२३ मध्ये महाराष्ट्रात साखर विक्रीचे मोठे आव्हान.

- १४० ते १४५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता

- कोटा प्रणालीशिवाय निर्यातीला परवानगी द्यावी.

- कोटाप्रणाली द्यायची असेल तर प्रत्येक साखर कारखान्याला त्यांना आलेल्या कोट्याची संपूर्ण साखर निर्यात करण्यास बंधनकारक करावी

- साखरनिर्यात करायची नसेल तर त्यांनी आलेला कोटा तीस दिवसांमध्ये सरकारला परत करावा.

‘ओपन जनरल लायसन’ प्रणाली लागू करा

कारखाने स्वतःला आलेला कोटा साखरनिर्यात (Sugar Export) न करता दुसऱ्या कारखान्यास आर्थिक मोबदला घेऊन ट्रान्स्फर करतात. त्यामुळे कोटा खरेदी करणारे साखर कारखान्यास साखरेचा भाव कमी मिळतो. याचा विचार करून सरकारने कोटा प्रणाली ही पद्धत लागू न करता कारखान्यांना मागील हंगामाप्रमाणे ‘ओपन जनरल लायसन’ ही प्रणाली लागू करावी. हंगाम २२-२३ मध्ये सरकारने निर्यातीची योग्य माहिती मिळणे करता, साखर कारखान्यांना ‘साखरनिर्यात रिलीज ऑर्डर’ घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी साखर उद्योगाची (Sugar Industry) आहे.

Sugar Export
State Cooperative Bank : राज्य सहकारी बँक सभेत दहा टक्के लाभांशास मान्यता

भारतामध्ये होणारे साखरेचे जादाचे उत्पादन तसेच ब्राझील आणि थायलंड या देशांमध्ये मागील हंगामापेक्षा जादाचे साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांसहित सर्वत्र मोठ्या प्रमाणात मंदीची लाट येण्याची शक्यता आहे. याचा विचार करता सरकारने आत्तापासूनच साखरनिर्यातीसाठी योग्य धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com