कृषी व्यवसाय नावीन्यता केंद्राद्वारे उद्योगाला चालना

केंद्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्राचे संचालकांचे प्रतिपादन
कृषी व्यवसाय नावीन्यता केंद्राद्वारे उद्योगाला चालना
Agriculture Business Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘कृषी व्यवसाय नाविन्यता केंद्राद्वारे नवीन संकल्पनांवर आधारित कृषी उद्योगाला चालना मिळेल. याद्वारे नवीन होतकरू शेतकरी तरुणांना उद्योजकतेचे धडे मिळतील,’’ असा विश्‍वास केंद्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मेजर सिंग यांनी व्यक्त केला.

नॅशनल ॲग्रिकल्चर फंडातून उभारण्यात येणाऱ्या कृषी व्यवसाय नाविन्यता केंद्राचे उद्घघाटन डॉ. सिंग यांच्या हस्ते झाले. या वेळी नावीन्यता केंद्राचे प्रमुख डॉ. राजीव काळे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अजय कुमार शर्मा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे शंतनू जगताप उपस्थित होते.

डॉ. सिंग म्हणाले,‘‘शेतकरी विविध तंत्रज्ञानाद्वारे आणि कुशल अनुभवानुसार भरघोस उत्पादन घेत आहे. मात्र या उत्पादनांवर मूल्यवर्धनासाठी नवनवीन उद्यमशील व्यवसायाची गरज आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी फंडातून उद्योजकतेला चालना आणि प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. स्टार्टअपद्वारे ग्रामीण भागातील कृषी उद्योजकतेसाठी कृषी व्यवसाय नावीन्यता केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राद्वारे मूल्यसाखळी विकास, प्रक्रियेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. याचा फायदा तरुणांनी घ्यावा.’’

कृषी व्यवसाय नावीन्यता केंद्राचे प्रमुख डॉ. काळे म्हणाले,‘‘या केंद्राअंतर्गत चार कृषी उत्पादक कंपन्यांसोबत स्टार्टअप्सचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये फार्मर्स स्माईल आणि वाघेश्‍वर (पुणे) थिंकप्युअर (अकोला), पोलान्दू (कर्नाटक) या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे मूल्यसाखळी आणि बीजोत्पादनामध्ये उद्योजकता विकास केला जाईल.’’

नॅशनल ॲग्रिकल्चर फंडातून कांदा लसूण संशोधन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या कृषी व्यवसाय नावीन्यता केंद्राअंतर्गत चार कृषी उत्पादक कंपन्यांसोबत स्टार्टअप्सचे करार करण्यात आले. या वेळी उपस्थित डॉ. मेजर सिंग आणि कंपन्यांचे पदाधिकारी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com