प्रोत्साहनपर अनुदानासाठी ८९ हजार शेतकऱ्यांची यादी

कर्जमाफीसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
Farmer
FarmerAgrowon

यवतमाळ : ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची (Crop Loan) नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारने घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील ८९ हजार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. कर्जमाफीसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

Farmer
तेलबिया, कडधान्यांसाठी विशेष अर्थसाह्य द्या

अडीच वर्षांपासून शेतकरी निधीच्या प्रतीक्षेत होते. ही बाब लक्षात घेता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंजुरी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (YDCC) ८९ हजार शेतकऱ्यांची यादी पाठविली आहे. अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी त्यासंदर्भात अद्याप कुठलाही शासनाचा आदेश काढण्यात आलेला नाही. म्हणून शासनाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची यादी वरिष्ठ कार्यालयात

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपली यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पाठविली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी नियमित सदस्यांची यादी आपापल्या मुख्यालयाला पाठविली आहे. त्यांनी ती यादी स्टेट लेवल बँकर्स कमिटीला पाठविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com