स्थानिक नाचणीपासून उभारला प्रक्रिया उद्योग

कोल्हापूर जिल्ह्यातील गंगापूर (ता भुदरगड) येथील उदय व वर्षा या भोसले दांपत्याने नाचणी प्रक्रिया उद्योग सुरू वेगळी वाट निवडली आहे.
Nachni
NachniAgrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) गंगापूर (ता भुदरगड) येथील उदय व वर्षा या भोसले दांपत्याने नाचणी प्रक्रिया उद्योग सुरू वेगळी वाट निवडली आहे. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या नाचणी उपपदार्थांची निर्मिती करत आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात नाचणीचे उत्पादन होते त्याच भागात उद्योग (Industry) सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यांचा उद्योग फायदेशीर झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड हा तसा कोकणासारखी भौगोलिक पार्श्‍वभूमी असलेला डोंगराळ भाग
आहे. जिल्ह्यातील गारगोटी हे या भागातील महत्त्वाचे शहर आहे. या शहरापासून नजीक भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथे उदय व वर्षा या भोसले दांपत्याने नाचणी प्रक्रिया उद्योग सुरू करून या भागाबरोबरच जिल्ह्यासाठी वेगळा आदर्श उभारला आहे.

नाचणी प्रक्रिया उद्योगाची दिशा (The direction of the dance processing industry)

उदय यांच्याकडे सहा एकर शेती होती. सुरुवातीला त्यांनी खासगी ठिकाणी नोकरी केली. पुढे
काजू कारखाना सुरू केला. पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याला काही मर्यादा आल्या. नफाही म्हणावा तसा होत नव्हता. अखेर त्यांनी उद्योग (Industry) बदलण्याचे ठरवले. सन २०१६-१७ मध्ये ते कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. सध्या आरोग्यदायी पदार्थ म्हणून नाचणीच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. शिवाय तालुक्‍यात सुमारे पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नाचणीचे पीक घेतले जाते. परंतु योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना (Farmer) नुकसान सोसावे लागते. या पार्श्‍वभूमीवर नाचणी प्रक्रिया उद्योग महत्त्वाचा ठरणार होता. कच्चा माल स्थानिक ठिकाणीच उपलब्ध होणार होता. पदार्थांना राज्यभर बाजारपेठ (Market) उपलब्ध करणेही शक्य होणार होते.

Nachni
शेतकरी नियोजन पीक : झेंडू

उद्योगाची उभारणी (Establishment of industry)

भोसले दांपत्याने उद्योग उभारल्यानंतर आवश्‍यक साधनसामग्री उभारण्यास सुरुवात केली.
साधारण २० गुंठे क्षेत्र उपलब्ध होते. नाचणी सुरुवातीला कच्च्या स्वरूपात असते. तिला पॉलिशिंग करून घ्यावी लागते. त्यासाठी तसेच बिस्किटे, शेवया, पीठ (Biscuits, vermicelli, flour) आदींसाठी व पॅकिंगसाठी अशी
यंत्रे घेतली. उद्योग सुरू करताना कच्च्या मालाची उपलब्धता करणे मोठे आव्हान होते. पती उदय यांनी आसपासच्या शेतकऱ्यांशी संपर्क(Farmer Contact) करीत नाचणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. भुदरगड तालुक्यातील कडगाव, पाटगाव, किल्ले भुदरगड या भागांबरोबरच चंदगड व राधानगरी तालुक्यातील नाचणी उत्पादक गावांमध्ये संपर्क करून शेतकऱ्यांसोबत बोलणी सुरू केली. नोव्हेंबरनंतर नाचणी निघण्यास प्रारंभ होतो.
गरजेनुसार व बाजारपेठेचा अंदाज घेत शेतकऱ्यांकडून खरेदी होते. वीस ते पंचवीस रुपये किलो असा दर दिला जातो. खरेदी केलेल्या नाचणीची व्यवस्थित साठवणूक होते. वर्षाला सुमारे तीस टनांपर्यंत खरेदी होते.

उत्पादने (Products)

व्यावसायिक पद्धतीने पदार्थ तयार करण्याचा अनुभव नव्हता. अनुभव हेच प्रशिक्षण या उक्तीप्रमाणे चुका, त्रुटी यातून वर्षा शिकत गेल्या. कोणती उत्पादने (Products) तयार करायची याची निश्‍चिती करण्यात आली. संपूर्ण पदार्थ निर्मितीचे काम वर्षा पाहतात तर उदय हे ‘मार्केटिंग’, आर्थिक व्यवहार, (‘Marketing’, financial transactions) संपर्क या जबाबदाऱ्या पाहतात. भोसले यांनी सुमारे २८ महिलांना रोजगार दिला आहे. त्यांच्यामार्फत विविध पदार्थ तयार केले जातात. दररोज सुमारे १०० किलो पापड,
प्रत्येकी ५० किलो शेवई, बिस्किटे, इडली मिक्स, डोसा मिक्स, अप्पे मिक्स आदी उत्पादने तयार होतात. नाचणीचे लाडू व मोदक पीठ ऑर्डरनुसार तयार केले जातात. याशिवाय आंबिल पीठ, ग्लुटेन फ्री कुकीज, शुगर फ्री कुकीज आदी पदार्थांची निर्मिती देखील होते. ‘युवाशक्ती’ असा ब्रँड (Yuvashakti’ brand) तयार केला आहे. विक्रीचे आवश्‍यक ते सर्व परवाने घेतले आहेत.


विक्री व्यवस्था (Sales arrangements)

नाचणीचे पदार्थ भुदरगड तालुक्यात होत असले तरी त्याची मागणी तिथे तेवढी नसते. त्यामुळे राज्यभरातील स्रोत शोधण्याचे काम भोसले यांनी केले. पुणे, बीड, सातारा, गोवा आदी ठिकाणी काही कंपन्या (Company) वा वितरक यांना घाऊक प्रमाणात विक्री होते. पुणे येथील शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाने (महाएफपीसी) (MAHAPC) पुणे येथील बाजार समितीत (Pune Market Committee) जागा उपलब्ध करून दिली आहे. पापड दोनशे रुपये, शेवया १५० रुपये, बिस्किटे २०० रुपये, इडली पीठ २१० रु, डोसा पीठ १८० रुपये, नाचणी पीठ ५० रुपये असे प्रति किलोचे दर आहेत. महिन्याला खर्च वजा जाता सुमारे दहा ते वीस टक्क्यांपर्यंत नफा राहतो. विक्रीनंतर तातडीने रक्कम मिळते. सध्या नाचणीचे संकलन व पदार्थांच्या विक्री भाडेतत्वावरील वाहनातून केली जाते. भविष्यात स्वतःचे वाहन घेण्याचे प्रयत्न आहेत.

भांडवल गुंतवणूक (Capital investment)

भोसले यांनी या उद्योगात सुमारे चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी सोलापूर येथील
लोकमंगल बँकेचे (lokmagal Bank) संस्थापक सुभाष देशमुख यांच्या अर्थसाह्य केले. त्यामुळे प्रकल्प उभारणीस बळकटी आली. कृषी अधिकाऱ्यांचीही चांगली मदत झाली. त्यांनीही भोसले कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य साठी प्रयत्न केले.

लॉकडाउनमधील संधी (Opportunity in lockdown)

व्यवसाय सुरू झाला आणि दोन वर्षातच लॉकडाउन (Lockdown) संकट उभे राहिले. यामुळे पदार्थ निर्मिती बरोबर मागणीलाही मर्यादा आल्या. गरजेपुरती निर्मिती होऊ लागली. या कालावधीत वर्षा यांनी मुलगी समृद्धी व शरयू यांच्या सहकार्याने विविध पदार्थ शिकून घेतले. समृद्धी या सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी
पदार्थ तयार करण्यातील अनेक त्रुटी दूर केल्या. त्यातून पदार्थांचा दर्जा अजून वाढवता आला.
लॉकडाउनचे संकट आता दूर होऊ लागल्यानंतर मागणीत वाढ होत आहे. केवळ देशातच विक्री न करता परदेशातील बाजारपेठ मिळवण्यासाठीही भोसले यांचे नियोजन सुरू झाले आहे.

संपर्क-
वर्षा भोसले, ९४२०६८७९२१
उदय भोसले, ९४२०६८७९२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com