Fertilizer : लिकिंगप्रकरणी ‘माफदा’चा कंपन्यांविरोधात एल्गार

कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त युरिया व संयुक्‍त खते उत्पादक तसेच पुरवठादार कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. त्यासाठी विक्रेत्यांची मागणी नसलेली इतर खते पुरविली जातात व त्याच्या विक्रीची सक्‍ती होते.
Fertilizer
Fertilizer Agrowon

नागपूर ः युरिया व संयुक्‍त खताच्या विक्रीच्या वेळी लिंकिंगचा (Fertilizer Linking) ठपका ठेवत कृषी विक्रेत्यावर कारवाई (Action Against Fertilizer Seller) केली जात आहे. त्यामुळे असे साहित्य यापुढे खरेदी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनने (Maharashtra Fertilizers Pesticide Seeds Dealers Association) आपल्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. त्यामुळे या पुढील काळात राज्यात कंपन्यांविरोधात विक्रेते असा संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Fertilizer
Chemical fertilizers सोबतच Organic Fertilizers पुरवण्याची खत कंपन्यांवर सक्ती | Agrowon

कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त युरिया व संयुक्‍त खते उत्पादक तसेच पुरवठादार कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. त्यासाठी विक्रेत्यांची मागणी नसलेली इतर खते पुरविली जातात व त्याच्या विक्रीची सक्‍ती होते. राज्यात लिंकिंग विरोधात शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाकडून कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. अनेक ठिकाणी परवाने निलंबन व रद्दची कारवाई होत आहे. कंपन्यांचा दोष असताना शिक्षा मात्र विक्रेत्यांना भोगावी लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘माफदा’ने या विरोधात पाऊल उचलत असे साहित्यच पदाधिकाऱ्यांनी खरेदी करू नये, अशी सूचना केली आहे.

Fertilizer
'युरियावरील लिकिंग रोखा'

कंपन्यांकडून थेट विक्रेत्यांच्या दुकानांपर्यंत खताचा पुरवठा झाला पाहिजे. मात्र कंपन्यांकडून वाहतूक व हमाली खर्चाची मागणी विक्रेत्यांना होते. परिणामी, छापील किरकोळ विक्री दरानुसार खत विकणे विक्रेत्याला शक्‍य होत नाही. वाहतूक व हमाली खर्च जोडून विक्रेते खताची विक्री करतात. परंतु किरकोळ विक्री दरापेक्षा अधिक दराने विक्री करता येत नसल्याने हा देखील नाहकचा भुर्दंड विक्रेत्यांना सोसावा लागत आहे. याची दखल घेत कंपन्यांकडून थेट पुरवठा व्हावा, अशी मागणी ‘माफदा’ने केली आहे. संघटनेचे महासचिव विपिन कासलीवाल, अध्यक्ष विनोद तराळ यांनी संयुक्‍तरीत्या हे निवेदन प्रसिद्ध केले.

पदाधिकाऱ्यांना अशा आहेत सूचना...

- लिंकिंगच्या सक्तीची बाब‍ जिल्हा संघटनेच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून द्यावी.

- अध्यक्षांनी लिंकिंग साहित्य पुरविण्यासंदर्भात कंपनीला मनाई करावी.

- लिंकिंगचा प्रकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

- संघटनेच्या लेटरपॅडवर तक्रार करावी

रवींद्र तुपकरांविरोधात रोष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र तुपकर यांनी निविष्ठा विक्रेत्यांबाबत अनुदगार काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी देखील संघटनेची मागणी आहे. त्यासाठी संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com