शेतकऱ्यांना ‘महाबीज’चे बियाणे तत्काळ उपलब्ध करा: फौजिया खान

काही बियाणे जास्त भावाने विकले जात आहेत, अशा तक्रारी येत आहेत. बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीज व इतर सर्व यंत्रणांसोबत बैठक घ्यावी.
शेतकऱ्यांना ‘महाबीज’चे बियाणे तत्काळ उपलब्ध करा: फौजिया खान
Soybean SeedsAgrowon

परभणीः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. कारखान्यांकडील थकीत ऊस देयके शेतकऱ्यांना अदा करावीत, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना शुक्रवारी (ता.१०) मागण्यांचे निवदेन देण्यात आले. खरिपाच्या पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतु काही विशिष्ट प्रकारची खते, बियाणे उपलब्ध होत नाहीत.

काही बियाणे जास्त भावाने विकले जात आहेत, अशा तक्रारी येत आहेत. बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीज व इतर सर्व यंत्रणांसोबत बैठक घ्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाण्यांचा तुटवडा निर्माण होणार नाही, या बाबत दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची देयके एफआरपीनुसार शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्यामुळे खरीप पेरणीसाठी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. देयके अदा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी, आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजियाखान, माजी खासदार सुरेश जाधव, भावना नखाते, प्रा. किरण सोनटक्के, संतोष देशमुख, नंदा राठोड, अजय गव्हाणे, सुमंत वाघ, सिध्दार्थ भराडे, सिद्धांत हाके, कल्पना दळवी आदींनी दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com