Mango Cluster : उत्तर प्रदेशात आंब्याच्या ‘मेगा क्लस्टर’साठी १०० कोटींची तरतूद

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये आंब्याचे मेगा क्लस्टर (Mango Mega Cluster) विकसित करण्यास मंजुरी दिली आहे.
Mango Cluster
Mango ClusterAgrowon

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये आंब्याचे मेगा क्लस्टर (Mango Mega Cluster) विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यावर पुढील पाच वर्षांत १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) म्हणाले.

‘उत्तर प्रदेश आंबा महोत्सव-2022’ च्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही आणि फलोत्पादन राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, “या मेगा क्लस्टरमध्ये लखनऊचे आंबे 'काकोरी ब्रँड' म्हणून ओळखले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने लखनऊमध्ये आंब्याच्या एका मेगा क्लस्टरला मंजुरी दिली आहे. ज्यावर पुढील पाच वर्षांत १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत."

या क्लस्टरमधील आंब्याची ओळख 'काकोरी ब्रँड' अशी केली जाईल. ही ओळख 'आझादीच्या अमृत महोत्सवा'चा भाग म्हणून काकोरीच्या महान वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंबा प्रदर्शनाला भेट दिली. महोत्सवाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले आणि राज्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव केला, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com