Mango Cultivation: राज्यात वाढतेय आंबा लागवड

देश पातळीवर २२ लाख हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली (Mango Cultivation) आहे, तर महाराष्ट्रात साडेचार लाख हेक्टरपर्यंत आंबा लागवड आहे. आंबा म्हटले की आपल्याला कोकण आठवतो.
Mango Cultivation
Mango CultivationAgrowon

राज्यात आंबा हे फळपीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक वहिवाट प्रशस्त करणारे ठरू लागले आहे. १९९० मध्ये महाराष्ट्रात आंबा पिकाखाली अवघे ४० हजार हेक्‍टर क्षेत्र होते. त्यात विस्तार होत आज साडेचार लाख हेक्‍टरवर क्षेत्र पोहोचले आहे. शासकीय आकडेवारीनुसार, २०२०-२१ या वर्षात राज्यामध्ये सुमारे १ लाख ६२ हजार हेक्‍टरवर नवी आंबा लागवड झाली आहे.

देश पातळीवर २२ लाख हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली (Mango Cultivation) आहे, तर महाराष्ट्रात साडेचार लाख हेक्टरपर्यंत आंबा लागवड आहे. आंबा म्हटले की आपल्याला कोकण आठवतो. या कोकणामध्ये हापूस, केसर जातींखाली १ लाख २५ हजार हेक्‍टरचे क्षेत्र आहे. त्यात प्राधान्य हापूसला असले तरी जातीनिहाय क्षेत्राची अचूक माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समजते.

आंब्याची गणना ही सदाहरित वृक्षामध्ये होते. कोय किंवा कलम लागवडीनंतर एक वर्षातच झाड मीटरभर पसरते. कलम लागवडीपासून तीन वर्षांनी उत्पादन घेण्यास सुरुवात होते. व्यावसायिक उत्पादन खऱ्या अर्थाने सातव्या वर्षापासून मिळू लागते. आंब्याचा प्रत्येक भाग उपयोगी असून, त्याचे लाकूडही चांगले असते. फळामध्ये जीवनसत्त्व ए आणि सी भरपूर असून, शर्करेचे प्रमाणही अधिक आहे.

शेतकऱ्यांची केसर आंब्याला पसंती

मराठवाड्यासह उर्वरित राज्यामध्ये केसर आंब्याची लागवड वाढत आहे. हा आंबा चवीला गोड असून, रस आणि कापून खाण्यासाठीही चांगला आहे. त्याचा देश आणि जागतिक पातळीवर चांगली मागणी आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीच्या लागवडीमध्ये आंब्यातील अंतर हे १० मीटर बाय १० मीटर होते. त्यात बदल होत अतिघन पद्धतीकडे शेतकरी वळले आहेत. त्याच प्रमाणे एप्रिलमध्येच आंबा बाजारात आणण्यासाठी वाढ नियंत्रकांचाही वापर केला जात आहे. त्यामुळे आंब्याला मोहोर अधिक येऊन लवकर फळधारणा होते, अशी माहिती डॉ. भगवान कापसे यांनी दिली.

Mango Cultivation
Odisha ATM :ओडिशात धान्य वाटपासाठी एटीएमसारखे मशीन

लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वर्षी दीड ते दोन टनांपर्यंत उत्पादन मिळते. शेतकऱ्यांमध्ये या पिकाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाकेसर आंबा बागायतदार संघाची उभारणी करण्यात आली आहे. संघाने ऑनलाइन वेबिनार व प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटीतून या पिकाचा प्रसारासाठी काम केले जात आहे. नुकतेच या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांना भेटी देत मार्गदर्शन केले.

अतिघन पद्धतीत वाढते उत्पादन ः

पूर्वी शिफारशीप्रमाणे बहुतांश शेतकरी १० बाय १० मीटर या अंतरावर लागवड करत असत. एकरी ४० झाडे बसत. मात्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याकरिता ५ बाय ५ मीटर अशी सघन लागवडीची शिफारस केली आहे. या पद्धतीनुसार एकरी १२० झाडे बसतात. आंबा लागवडीसाठी सहा मीटर बाय चार मीटर हे लागवड अंतर जागतिक स्तरावर मान्य आहे. कोरडवाहूमध्ये ३ मीटर बाय ५ मीटर या लागवड अंतराची शिफारस इस्राईलसह काही आंबा उत्पादक देशांमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया हा आंबा उत्पादनातील आघाडीचा देश मानला जातो. येथे सहा मीटर बाय ४ मीटर याप्रमाणे लागवड अंतर हे शिफारशीत आहे.

Mango Cultivation
Chilli: आंध्र प्रदेशात मिरचीचा ठसका का वाढतोय?

लागवड अंतरानुसार सरासरी उत्पादन

२० बाय २० फूट - ३ ते साडेतीन टन

१५ बाय २० फूट - चार ते पाच टन

१५ बाय १५ फूट - चार ते साडेचार

१२ बाय ६ फूट - १० ते १२ टन

१५ बाय ७ फूट - ८ ते १० टन

१० बाय १० फूट - चार टन

१५ बाय २० फूट - सहा टन

Mango Cultivation
MSP panel: हमीभाव समितीत पंजाबला स्थान देण्याची मागणी

अतिघन लागवडीमध्ये छाटणी महत्त्वाची

पायरी, नीलम आणि हापूस यांचे संकरित ‘रत्ना’, कोकण रुची (लोणच्यासाठी प्रसिद्ध), कोकण राजा (सॅलडसाठी) याप्रमाणे कोकण विद्यापीठाचे वाण आहेत. अतिघन पद्धतीमध्ये झाडाचा विस्तार आटोक्यात ठेवण्यासाठी छाटणी वेळच्या वेळी करत राहणे आवश्यक आहे. कोय, कलम लावल्यानंतर एक वर्षात झाडाचा विस्तार मीटरभराचा होतो. तेव्हा डोळ्याखालून ७० सेंटिमीटरवर कट करावा. त्याला फुटलेल्या दोन फांद्या वाढू द्याव्यात. पुन्हा कट करावे. पुन्हा दोन चांगल्या फांद्या वाढू द्याव्यात, अशा प्रकारे झाडांचा योग्य तितका विस्तार करून घ्यावा.

या दरम्यान सेंद्रिय व रासायनिक खतांच्या साह्याने पोषण होईल, याची काळजी घ्यावी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील उद्यानविद्या विभागातील तज्ज्ञ डॉ. महेश कुळकर्णी सांगतात. दमट हवामानात कीड-रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. फळ तयार होण्याच्या अवस्थेत फळमाशीचा प्रादुर्भाव होतो.

Mango Cultivation
Wheat Export Ban :निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना नाही: तोमर

आंबा पिकात कीड-रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारण्याचे एक नियोजन विद्यापीठाने तयार केले आहेत. त्या शिफारशीनुसार नियंत्रणावर भर द्यावा. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर बोर्डोची फवारणी उपयोगी ठरते, असे ते सांगतात. कच्ची कैरी ते पिकलेला आणि रसाळ आंबा अशा साऱ्याच वर्गवारीतील आंब्याना मागणी राहते. मात्र बाजारात ज्याचा आंबा लवकर येईल अशा शेतकऱ्याला चांगले उत्पन्न होते. त्यामुळे दर्जा राखत स्वतःचा ‘ब्रॅण्ड’ बाजारात तयार करणेही तितकेच आवश्यक असते.

औरंगाबादनजीक बहरला १०० एकरांवर आंबा

इसारवाडी व ढाकेफळ (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे सुमारे १०० एकरांवर आंबा लागवड करणाऱ्या ‘ॲग्रीटेक फार्म’ कंपनीचे व्यवस्थापक रसूल शेख यांनी सांगितले, की १९९७-९८ मध्ये आम्ही २० बाय २० फूट अंतरावर आंबा लागवड केली होती. मात्र त्यातून उत्पादन कमी मिळत असल्याचे जाणवू लागले. दरम्यानच्या काळात झाडांच्या मध्ये नव्या कलमांची लागवड करून जुनीच बाग अतिघन पद्धतीमध्ये रुपांतरीत करण्यावर भर दिला आहे. आमच्याकडे केसर खाली सर्वाधिक क्षेत्र असून, त्यानंतर लंगडा, दशहरी, राजापुरी, वनराज या जाती काही प्रमाणात आहेत. बागेत एकूण झाडे २२ हजार आहेत. त्यापासून ३५० ते ४०० टन उत्पादन होते.

उत्पादित फळांची ‘नेचरफ्रेश’ या ब्रॅण्डने विक्री केली जाते. पूर्वी मालाची प्रत आणि त्यात कीडनाशकांचा अंश मर्यादित असल्याने निर्यातीसाठीही आंबा देत होतो. मात्र निर्यातदार केवळ अपेक्षित दर्जाचा माल उचलतात. काही काळातच हा व्‍यवहार फायदेशीर ठरत नाही, असे रसूल शेख यांनी सांगितले. बाजारपेठेमध्ये माल पाठवला जातो. तसेच ग्राहकांना थेट बागेतून विक्री केली जाते. दर्जामुळे बाजारातील दरापेक्षा १० ते २० रुपये प्रति किलो अधिक दर मिळत असल्याचे रसूल शेख सांगतात.

- शेख रसूल, ९४२१४१३९५४

(व्यवस्थापक, ॲग्रीटेक फार्म, औरंगाबाद)

दगडकर यांनी राखले सातत्य

अमरावती जिल्ह्यातील उसळगव्हाण (ता. धामणगाव रेल्वे) येथील नितीन दगडकर यांच्याकडे १७० आंबा झाडे आहेत. त्यात रत्ना, केसर, दशहरी, पायरी या जातींचा समावेश आहे. एकूण ६५० ते ७०० क्रेट आंबा उत्पादन होते. दशहरी, केसर, पायरी १५० रुपये प्रति किलो, तर रत्ना २०० रुपये प्रति किलो विकला जातो. आंबा बागेतून वर्षाकाठी सहा लाख रुपये मिळतात. तसेच व्यवस्थापन खर्च ही तुलनेने कमी असल्यामुळे हे पीक फायद्यात राहत असल्याचे नितीन सांगतात.

- नितीन दगडकर, ९८६०२८७७१७

डॉ. भगवान कापसे, ९४२२२९३४१९

(उपाध्यक्ष, महाकेसर आंबा बागायतदार संघ)

- महेश मनमोहन कुळकर्णी, ९४२२६३३०३०

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com