MSP Procurement : गुजरातमध्ये २१ जुलैपासून मुगाची हमीभावाने खरेदी

मुगाच्या सरकारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ११ जुलै ते २० जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक गावातील ई -ग्राम सेंटरवर शेतकऱ्यांना ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
Green Gram
Green GramAgrowon

(वृत्तसंस्था):

गुजरात सरकार २१ जुलैपासून राज्यातील शेतकऱ्यांकडून मुगाची (Green Gram) हमीभावाने (MSP) खरेदी करणार आहे. मुगाचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारी खरेदीची मागणी केली जात होती.

मुगाच्या सरकारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ११ जुलै ते २० जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक गावातील ई -ग्राम सेंटरवर शेतकऱ्यांना ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आपला मूग हमीभावाने (MSP) म्हणजे प्रति क्विंटल ७७५५ रुपये दराने विकता येईल.

Green Gram
Narendra Modi: किसान संघाचा मोदी सरकारला घरचा अहेर

सध्या गुजरातमधील बहुतांश बाजारांत मुगाचे दर हमीभावापेक्षा (MSP) उतरले आहेत. सौराष्ट्र बाजारात मुगाला (Green Gram) प्रति क्विंटल ४७५० ते ६२५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुरुवारी (ता. ७) राजकोटच्या बाजारात ४२५ क्विंटल मुगाची आवक झाली.

Green Gram
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

गुजरातमध्ये नाफेड (Nafed) मुगाच्या सरकारी खरेदीचे नियंत्रण करणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या इंडियाॲग्रो कन्सॉर्टियम प्रोड्युसर लिमिटेड कंपनी या नोडल एजन्सीच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे. इंडियाॲग्रो कन्सॉर्टियम प्रोड्युसर लिमिटेड कंपनी ही शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आहे.

राज्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांत (APMC) मुगाला हमीभावापेक्षा (MSP) कमी दर मिळत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने मुगाची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे गुजरातचे कृषीमंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com