NRC Grapes: ‘एनआरसी ग्रेप्स’चा दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार

द्राक्ष पावडर आणि बेदाण्यातील शरीराला उपयुक्त घटकांमुळे पोषणमूल्य असणारा नवीन कल्पनाधारीत न्यूट्री बार (Nutrient Bar) लवकरच बाजारात उपलब्ध होईल.’’
grapes
grapesAgrowon

पुणेः राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील ‘ॲग्री बिझनेस इंक्युबॅशन सेंटर’द्वारे (एबीआय) दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. हस्ताक्षर समारंभ आयोजित करण्यात आला. एबीआय केंद्राद्वारे द्राक्ष उत्पादन (grapes production) व निगडित प्रक्रिया उद्योगांसाठी नवउद्योजकांना तांत्रिक साहाय्य देण्यात येते. या आधीही एकूण आठ करार झालेले आहेत.

‘एबीआय’चे प्रमुख डॉ. अजय कुमार शर्मा यांनी दोन्ही कंपन्यांची माहिती दिली. त्यांची भविष्यातील उद्दिष्टे सादर केली. त्यापैकी मांजरी येथील मे. लता फूड प्रॉडक्ट्सच्या लीना सावंत तसेच प्रकाश जगताप यांच्या ‘न्यूट्री बार निर्मिती’ या प्रकल्पासाठी करार करण्यात आला.

सावंत म्हणाल्या, ‘‘द्राक्ष पावडर तसेच बेदाणे वापरून लहान बालकांसाठी तसेच वयोवृद्धांसाठी पोषक न्यूट्री बार तयार करण्याचा मानस व्यक्त केला. यामुळे द्राक्ष पावडर आणि बेदाण्यातील शरीराला उपयुक्त घटकांमुळे पोषणमूल्य असणारा नवीन कल्पनाधारीत न्यूट्री बार (Nutrient Bar) लवकरच बाजारात उपलब्ध होईल.’’

गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील मे. रेजनरी एलएलबीचे रउफ नाईकवाडी आणि सुजित कुदळे यांनी बेदाण्यावर प्रक्रिया करत बेदाणा जॅम तसेच बेदाण्यापासून बनवण्यात येणारे मुखवास (माऊथ फ्रेशनर) निर्माण करणारा अनोखा प्रकल्प सादर केला.

grapes
Irrigation: झारखंडकडून सिंचनासाठी आर्थिक पॅकेजची मागणी

एबीआय केंद्रातर्फे मिळणाऱ्या तांत्रिकी सेवांच्या आधाराने ही उत्पादने निर्माण केली जातील. ‘एनआरसी’चे निर्देशक डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. अहमद शबीर टीपी यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसंगी डॉ. अजय कुमार उपाध्याय, डॉ. निशांत देशमुख, रोहित पलघडमल आणि डॉ. गणेश जाधव हे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com