पीकविमा, पतधोरणासाठी कृषी मंत्रालयाचा युएनडीपीसोबत सामंजस्य करार

या सामंजस्य करारांतर्गत, यूएनडीपी एकत्रित कृषी कर्ज आणि पीक विम्याच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालयाला मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करेल आणि जागतिक स्तरावरील आपल्या ज्ञानाचा लाभ मिळवून देईल.
 Pradhan Mantri Fasal Bima Yojana
Pradhan Mantri Fasal Bima YojanaAgrowon

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) आणि सुधारित व्याज अनुदान योजना-किसान क्रेडिट कार्ड या योजनांसाठी तांत्रिक मदत करणार आहे. त्याचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचे (PMFBY) प्रमुख कार्यकारी अधिकारी रितेश चौहान आणि यूएनडीपीचे निवासी प्रतिनिधी शोको नोडा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारांतर्गत, यूएनडीपी एकत्रित कृषी कर्ज आणि पीक विम्याच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालयाला मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करेल आणि जागतिक स्तरावरील आपल्या ज्ञानाचा लाभ मिळवून देईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि कृषी सचिव मनोज आहुजा यावेळी उपस्थित होते.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितांसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पारदर्शक पद्धतीने विमा योजना राबवली जात असल्याचे यावेळी केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी सांगितले. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा थेट लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत (PMFBY) २१ हजार कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता भरला असताना, त्यांना १.१५ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजना कशी निर्णायक ठरते आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे, किसान क्रेडिट कार्ड योजनेत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी योजनेचा लाभ घेता आला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. सर्व लहान शेतकरी, पशुपालक शेतकरी आणि मच्छीमारांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

या सामंजस्य करारानुसार,लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, भागपीक, भाडेकरू आणि बिगर कर्जदार शेतकरी यांचे हित लक्षात घेऊन,यूएनडीपी कृषी कर्ज आणि पीक विम्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रतिसादात्मक, तसेच मागणीप्रमाणे तांत्रिक मदत करेल, त्याचप्रमाणे विद्यमान राष्ट्रीय आणि विविध राज्यातील संस्थांना क्षमता, विकास आणि माहिती, शिक्षण आणि दळणवळण यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com