Mustard Market : मोहरी लागवड विक्रमी टप्प्याकडे; तापमानवाढीचा पिकाला फटका

देशात सध्या मोहरी लागवडीचा वेग अधिक आहे. आत्तापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा मोहरीखालील क्षेत्र ९ टक्क्यांनी अधिक आहे. तर यंदा गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन वाढीचा अंदाज आहे.
Mustard Market
Mustard MarketAgrowon

पुणेः देशात सध्या मोहरी लागवडीचा (Musterd Cultivation) वेग अधिक आहे. आत्तापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा मोहरीखालील क्षेत्र ९ टक्क्यांनी अधिक आहे. तर यंदा गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन वाढीचा अंदाज आहे.

पण मोहरी पिकावर (Musterd Crop) वाढलेल्या तापमानाचाही परिणाम दिसत आहे, असे उद्योगांनी स्पष्ट केले.

देशातील मोहरी उत्पादन (Musterd Production) वाढीच्या अंदाजाने भारताला फायदेशीरच आहे. खाद्यतेल वापर आणि आयातीत भारत जगातील महत्वाचा देश आहे.

भारताला गरजेच्या ६५ टक्क्यांपर्यंत खाद्यतेल आयात करावी लागते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताला खाद्यतेल आयातीवर १ लाख ८९ हजार कोटी रुपये खर्च करावा लागला.

भारताच्या आयातीत पामतलेचा समावेश अधिक असतो. तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयातही मोठ्या प्रमाणात केली जाते.

भारताला प्रामुख्याने मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटीना, युक्रेन आणि रशिया देशांकडून खाद्यतेल पुरवठा होतो.

Mustard Market
GM Mustard : जीएम मोहरी : संधी आणि धोके

तेलबियांचा विचार करता मोहरीत सर्वाधिक तेलाचे प्रमाण असते. देशातील मोहरी लागवड यंदा ९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

आत्तापर्यंत देशातील मोहरी लागवड ८८ लाख हेक्टरवर पोचली आहे. तर मागीलवर्षीची लागवड ८१ लाख हेक्टरवर होती.

तर देशातील मोहरी लागवड ९४ ते ९५ लाख हेक्टरच्या दरम्यान वाढविण्यास संधी आहे, असे साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं.

Mustard Market
GM Mustard : जीएम मोहरी वाणावरुन वाद का सुरु झाला? | Agrowon | ॲग्रोवन


उत्पादनाचा अंदाज


देशातील मोहरी लागवड वाढत असली तरी हवामान पोषक राहणं गरजेचं आहे. मागील हंगामात देशात ९१ लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली होती.

त्यातून ११० लाख टन मोहरी उत्पादन झाले होते. यंदा लागवडीची गती पाहता १२० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.

पण सध्या मोहरी उत्पादक पट्ट्यात बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादनाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.

तापमानाचा उत्पादनावर परिणाम


मोहरीचे चांगले उत्पादन येण्यासाठी तापमान कमी असण्याची आवश्यकता आहे. तापमान सरसरी किंवा थोडे कमी असले तरी मोहरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता चांगली मिळू शकते.

पण सध्या उत्तरेतील मोहरी उत्पादक पट्ट्यात सध्या सरासरीपेक्षा २ ते ५ टक्के अधिक तापमान आहे. याचा फटका मोहरी उत्पादनाला बसू शकतो, असा अंदाज काही उद्योजक व्यक्त करत आहेत.

 --

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com