Mustard Market : मोहरी उत्पादन ११५ लाख टनांवर पोचणार: एसईए

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारीला देशातील पीक उत्पादनाचा दुसरा अंदाज जाहीर केला. या अंदाजात केंद्राने १२८ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असे म्हटले आहे.
Mustard Market
Mustard MarketAgrowon

Mumbai News : देशात मागील दोन वर्षे मोहरीला चांगला दर (Mustard Rate) मिळला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोहरीची लागवड (Mustard Cultivation) वाढवली. परिणामी यंदा मोहरीचे उत्पादन विक्रमी ११५ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने व्यक्त केला.

कोरोना काळात देशात खाद्यतेलाचा तुटवडा होता. त्यामुळे तेलाचे दर तेजीत होते. परिणाम मोहरीसह सोयाबीनचे दरही तेजीत आले. मागील हंगामात मोहरीला ७ ते ८ हजार रुपयांचा दर मिळाला.

त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड वाढवली. यंदाही मोहरीची लागवड ९८ लाख हेक्टरवर झाली. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारनेही व्यक्त केला.

Mustard Market
Mustard Market : सरकार १५ लाख टन मोहरी हमीभावाने खरेदी करणार

एसईएने मार्च महिन्याच्या सुरुवातील देशातील मोहरी पिकाचा सर्व्हे केला. यातून ही माहिती समोर आली. एसईएने २०२५-२६ पर्यंत देशातील मोहरी उत्पादन २०० लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

त्यासाठी माॅडेल मस्टर्ड फार्म प्रोजेस्ट सुरु करण्यात आला. या प्रोजेक्टचा सकारात्मक परिणाम पुढे येत असल्याचाही दावा एसईएने केला.

एसईएकडून ९ राज्यांत सर्वेक्षण

एसईएने आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये सर्वेक्षण केले. यातून देशात यंदा जवळपास ९६ लाख हेक्टरवर मोहरीचे पीक आहे.

तर केंद्राने यंदा ९८ लाख हेक्टरवर मोहरी पीक असल्याचे म्हटले आहे. यंदा मोहरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता १ हजार २०३ किलोवर पोचण्याचा अंदाज आहे. यातून देशात यंदा ११५ लाख टन उत्पादन होईल, असे एसईएने म्हटले आहे.

Mustard Market
Agrowon Podcast : सोयाबीन, मोहरी दरवाढीसाठी सरकार पामतेल आयातशुल्क वाढवणार?

केंद्र सरकारचा अंदाज

केंद्र सरकारने १४ फेब्रुवारीला देशातील पीक उत्पादनाचा दुसरा अंदाज जाहीर केला. या अंदाजात केंद्राने १२८ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असे म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात १२० लाख टन उत्पादन झाले होते. त्यात यंदा ८ लाख टनांची भर पडेल.

यंदा राजस्थानमधील उत्पादन जवळपास ४५ लाख टनांवर पोचेल. तर मध्य प्रदेशात १८ लाख टन आणि उत्तर प्रदेशात १७ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज केंद्राने जाहीर केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com