Sugar Export : नव्याने निर्यात परवानगी नाहीच

मे महिन्याच्या अखेरीस साखर निर्यातीवर निर्बंध आणल्यानंतर केंद्राने जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने जेवढे अर्ज येतील त्या अर्जांच्या मागणीच्या ४० टक्के इतकीच साखर निर्यातीस परवानगी दिली होती.
Sugar Export
Sugar Export Agrowon

कोल्हापूर : केंद्राने जूनमध्येच दिलेल्या साखर निर्यात (Sugar Export) कोट्यातील साखर उठाव करण्यासाठी पंधरा दिवसांची वाढ दिली आहे. पावसाळी स्थिती व अन्य कारणांमुळे कारखान्यांना परवानगी दिलेली साखर परदेशात पाठवण्यासाठी अडचणी येत आहेत. या कारणामुळे ही मुदतवाढ दिल्याचे केंद्राने पत्रात म्हटले आहे. नव्याने निर्यातीसाठी परवानगी न मिळाल्याने साखर उद्योगात (Sugar Industry) मात्र नाराजीचेच वातावरण आहे. (Restriction On Sugar Export)

Sugar Export
Sugar Export: अतिरिक्त साखर निर्यातीला हिरवा कंदील?

मे महिन्याच्या अखेरीस साखर निर्यातीवर निर्बंध आणल्यानंतर केंद्राने जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने जेवढे अर्ज येतील त्या अर्जांच्या मागणीच्या ४० टक्के इतकीच साखर निर्यातीस परवानगी दिली होती. सहा जूनला आठ लाख टन साखरनिर्यात करण्याची परवानगी केंद्राने दिली होती व ही साखर एक महिन्यात निर्यात करावी, असेही म्हटले होते.

केंद्राच्या सूचनेनुसारही साखर सहा जुलैपर्यंत परदेशात जाणे अपेक्षित होते; मात्र पावसाळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखान्यांना परवानगी दिलेली साखरसुद्धा कारखान्यातून बाहेर काढणे शक्य झाले नाही. याचा तोटा होऊ नये यासाठी २० जुलैपर्यंत कारखान्यांना ही साखर बाहेर काढण्यासाठी परवानगी दिल्याचे केंद्राने म्हटले आहे.

केंद्रातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणखी निर्यातीला परवानगी मिळू शकते, असे सांगून एक महिन्याचा कालावधी झाला असला तरी अजूनही केंद्राच्या वतीने नव्याने निर्यातीला परवानगी मिळाली नाही. ६ जूनला परवानगी दिलेली साखरच अजून निर्यात होत आहे. यामुळे नव्याने होणारे निर्यात करार आणि त्याची अंमलबजावणी जवळ जवळ ठप्प असल्यासारखी स्थिती आहे.

साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात पाऊस सक्रिय होत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस वाढल्यास बंदरावरचे सर्व कामकाज ठप्प होणार आहे. अजूनही बहुतांश बंदरांवर निर्यातीचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. केंद्राने पावसाचा जोर वाढण्याआधीच साखर निर्यातीला परवानगी देणे गरजेचे आहे; अन्यथा नंतर परवानगी देऊनसुद्धा पावसाळी परिस्थितीमुळे साखर बाहेर जाणे अशक्य आहे.

...तर निर्यात प्रक्रिया संथच राहील

केंद्रीय स्तरावरून नव्याने निर्यातीला परवानगी देण्यासाठी केवळ चालढकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर निर्यातीला परवानगी देऊन काहीही उपयोग होणार नाही, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. निर्यातीची गती अजूनही धीमीच आहे. जोपर्यंत नव्याने निर्यातीला परवानगी मिळत नाही तोपर्यंत निर्यातीची प्रक्रिया अशीच संथ राहील, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com