चुकीच्या करारापेक्षा करारच नको

भारतासारख्या देशांमधील अन्नसुरक्षा कायद्याचा जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होत असल्याची श्रीमंत देशांची तक्रार आहे.
चुकीच्या करारापेक्षा करारच नको

जीनिव्हा : कोरोना परिस्थितीची पार्श्‍वभूमी, रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि जगभरातील अन्नसुरक्षेच्या (Food Security) प्रश्‍नासह अनेक जागतिक प्रश्‍नांना व्यापाराच्या माध्यमातून उत्तर शोधण्यासाठी जीनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेची (World Trad Conference) (डब्ल्यूटीओ) १२ वी मंत्रिपरिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतासारख्या देशांमधील अन्नसुरक्षा कायद्याचा (Food Security Act) जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होत असल्याची श्रीमंत देशांची तक्रार आहे. ही तरतूद काढून टाकावी, यासाठी श्रीमंत देश आग्रही आहेत. याबाबत झालेल्या चर्चेवर बुधवारीही (ता. १५) तोडगा निघाला नाही. भारतानेही, चुकीचा करार करण्यापेक्षा करारच नको, अशी भूमिका घेतली. भारतीय संस्थांनीही सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला.

येथील मंत्रिपरिषदेमध्ये नियोजित कालावधीत अखेरपर्यंत समन्वय न झाल्याने मंत्रिपरिषद आणखी एक दिवस पुढे चालू ठेवण्याचा निर्णय बुधवारी (ता. १५) घेण्यात आला. परिषदेचा कालावधी एक दिवस वाढला असला तरी भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भारतासारख्या देशांमधील अन्नसुरक्षा कायद्याचा जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होत असल्याची श्रीमंत देशांची तक्रार आहे. मात्र, अन्नसुरक्षा कायद्यामुळेच भारतीय शेतकरी टिकून आहे व तो जागतिक योगदानासही समर्थ राहील, अशी आम्हाला आशा आहे, ही भारताची भूमिका अनेक सदस्य देशांना भारावून गेली. अन्नसुरक्षेबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडताना भारताने या मुद्द्यावर ठाम राहणार असल्याचे सांगितले. ‘आमच्याकडे अन्नसुरक्षा नसती, तर कोरोनाकाळात कोट्यवधी जनतेला आम्हाला मोफत अन्नपुरवठा करता आला नसता. त्यामुळे अन्नसुरक्षा गरजेची आहे. आम्ही इतर गरजू देशांनाही अन्नधान्य पुरवण्यासही तयार आहोत. आम्हाला संरक्षित अन्नधान्याचा व्यापार करायचा नाही, तर इतरांना सहकार्य करायचे आहे,’ असे स्पष्टीकरणही भारताने दिले.

चर्चेतील इतर मुद्दे

मत्स्य व्यवसायाला असलेले अनुदान काढणार नाही, आम्हाला मच्छीमारांची काळजी आहे, असे भारताने स्पष्ट केले. या भूमिकेला इतर काही देशांची मान्यता न मिळाल्याने त्याबाबत मसुदा बनला नाही. कोरोना संसर्गाच्या कालावधीतील पेटंट कायद्यातून सवलतीचा मुद्दाही श्रीमंत देशांनी स्वीकारला नाही. ‘डब्ल्यूटीओ’च्या रचनेत सुधारणेची विकसनशील देशांची मागणीही श्रीमंत देशांनी मान्य केली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com