Tur Rate : तूर आयातीला पुन्हा पायघड्या ?

यंदा तूर उत्पादन घटणार; दर तेजीत राहण्याचा अंदाज
Tur Rate
Tur Rate Agrowon

अनिल जाधव
पुणेः आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची गोची केली. केंद्राने मुक्त तूर आयातीच्या (Tur Import) धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ दिली. सरकारच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसेल. पण यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज असल्याने दरही (Tur Rate) चांगले राहतील, असा अंदाज तूर बाजारातील (Tur Market) जाणकारांनी व्यक्त केला.

Tur Rate
Tur Rate : आयात वाढूनही तूर तेजीतच

भारत तुरीचा एकमेव मोठा ग्राहक आहे. देशात दरवर्षी ४४ ते ४५ लाख टनांच्या दरम्यान तुरीचा वापर होत असतो. मागीलवर्षी देशातील तूर उत्पादन चांगले झाले होते. देशातील तूर उत्पादन ४३ लाख ५० हजार टनांवर पोचले होते. म्हणजेच देशातील मागणी पूर्ण होऊ शकली असती. मात्र असे असनातही सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबविले होते. त्यामुळे देशात तुरीची विक्रमी ८ लाख ६० हजार टन आयात झाली होती. त्यामुळे बाजारात तुरीचे दर दबावात येऊन शेतकरी अडचणीत आले होते.

Tur Rate
Tur Market : देशात तूर आयात वाढली

मागीलवर्षी सरकारने तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. लागवड कमी झाल्याचे पाहून स्टाॅकिस्ट आणि उद्योगांनी नफेखोरी सुरु केली होती. त्यामुळे तुरीला ७ हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळतो आहे.

शेतकऱ्यांना चांगाल भाव मिळाला नाही म्हणूनच यंदा लागवड कमी झाल्याचे उद्योगाचेही म्हणणे आहे. पण सरकारने यातून धडा घेतला नाही. सरकारने मुक्त आयात धोरणाला आता एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता २३ मार्च २०२४ पर्यंत तूर आयातीवर बंधने नसतील. म्हणजेच यंदाही गेल्यावर्षीएवढीच तूर आयात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

किती तूर मिळेल?

जागतिक पातळीवर १० लाख टनांपेक्षा जास्त तूर उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. कारण भारत वगळता इतर देशांमध्ये आहारात तुरीचा वापर होत नाही. तुरीचा मुख्य ग्राहक भारतच आहे. केवळ भारताला पुरवठा करण्यासाठीच म्यानमार आणि आफ्रिकेत तूर पिकवली जाते.

बाजारावर काय परिणाम होऊ शकतो?

त्याच यंदा देशातील तूर उत्पादन कमी आहे. देशात ३२ ते ३५ लाख टनांपर्यंतच उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर गेल्यावर्षीऐवढी आयात झाली तर देशात तुरीची टंचाई जाणवेल. त्यामुळं सरकारनं मुक्त आयातीला मुदतवाढ दिली तरी तुरीला चांगला दर मिळू शकतो. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. हा दर टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com