Onion : खानदेशात कांदा लागवड घटणार

मागील खरिपात किंवा पावसाळ्यात खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु कांद्याचे पावसात अतोनात नुकसान झाले.
 Onion
OnionAgrowon

जळगाव ः खानदेशात या हंगामात कांदा लागवड (Onion Cultivation) कमी होईल, अशी स्थिती आहे. मागील हंगामातील कमी दर (Onion Rate) व महागडे बियाणे (Onion Seed) यामुळे अनेक शेतकरी लागवड टाळतील, असे दिसत आहे.

मागील खरिपात किंवा पावसाळ्यात खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु कांद्याचे पावसात अतोनात नुकसान झाले. पुढे रब्बीतही लागवड बऱ्यापैकी झाली, पण दर ५०० रुपये क्विंटलवर अनेकांना मिळाले नाहीत. यात शेतकऱ्यांना मोठा तोटा मागील दोन हंगाम सहन करावा लागला आहे. एकरी किमान २५ ते ३० हजार रुपये तोटा कांदा उत्पादकांना झाला. हा तोटा कसा भरून काढावा, हा मुद्दा आहे. यामुळे या हंगामात कांदा लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

 Onion
Onion Export: कांदा निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ

कांद्याचे दर कवडीमोल असतानाच कांदा बियाण्याचे दर मात्र तेजीत आहेत. विविध कंपन्यांचे बियाणे १२०० ते १४००, १५००, २०००, २२०० रुपये प्रतिकिलो या दरात मिळत आहे. कांदा बीजोत्पादकांचेही नुकसान झाले. परंतु कांदा बियाणे उत्पादकांना लाभ होत आहे. अर्थात बियाण्याचे दर अवाजवी आहेत. अधिकची नफेखोरी केली जात आहे. कांदा बीजोत्पादकांकडून खरेदीदारांनी २००, ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दरात बियाण्यांची खरेदी केली.

 Onion
Onion: कांदा, बटाटा, टोमॅटो लागवडीवर परिणाम नाही

काही कंपन्यांनी बीजोत्पादनाचे करार शेतकऱ्यांशी केले. हमीदर बियाण्याला दिला, पण हा दरही परवडणारा नव्हता. कारण बियाण्याचे उत्पादन हवे तेवढे आले नाही. दुसरीकडे बियाण्यांचे दर कमी झालेले नसल्याने कांदा लागवडीचे नियोजन अनेकांनी टाळले आहे.

महाग बियाणे, मजूरटंचाई, वित्तीय संकटे, अतिपावसाचे संकेत यामुळे कांदा लागवड घटेल. खानदेशात या हंगामातही १५ हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित होती. तसेच सुमारे दोन ते अडीच हजार एकरात कांदा रोपवाटिकांची निर्मिती होईल, असाही अंदाज होता. परंतु हा अंदाज फोल ठरला आहे. कांदा रोपवाटिकादेखील नगण्यच आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे व साक्री याच भागात काही शेतकऱ्यांनी कांदा रोपवाटिका व लागवडीचे नियोजन केले आहे. लागवडदेखील फक्त सात ते आठ हजार हेक्टरवर होईल, असेही सांगितले जात आहे.

कांदा बियाण्याचे दर चढेच आहेत. कांदा पीक मागील दोन हंगामात परवडले नाही. मोठा तोटा झाला. दरांची हमी नाही. खर्च वाढत आहे. यामुळे कांदा लागवड यंदा टाळली आहे.
दीपक पाटील, शेतकरी, माचला, जि. जळगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com