मराठवाड्यात केवळ १९ टक्के कर्जपुरवठा

शासन आणि संबंधित यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी
Crop Loan
Crop Loan Agrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच बँकांनी आजवर केवळ १८.७६ टक्के कर्जपुरवठ्याची (Loan Supply) उद्दिष्टपूर्ती केली आहे. पुन्हा एकदा वेळेवर कर्जपुरवठा (Crop Loan) होण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा शासनाकडून व यासंबंधीच्या यंत्रणेकडून बोलण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह (District Co Operative Bank) व्यापारी बँका व ग्रामीण बँक मिळून १० हजार ८०४ कोटी ६१ लाख ६४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ६ जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील सर्वच बँकांनी मिळून ३ लाख ११ हजार ५८८ शेतकऱ्यांना केवळ २०२७ कोटी २५ लाख ९३ हजार कर्जपुरवठा करून १८.७६ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी १ लाख ७४ हजार ८७३ शेतकऱ्यांना ६८७ कोटी १४ लाख ११ हजार रुपये कर्ज पुरवठा करत २४. ७९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

सर्वाधिक कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी ६९ हजार २४८ शेतकऱ्यांना ७७६ कोटी ७९ लाख २० हजार रुपये कर्जपुरवठा करत १२.४९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ग्रामीण बँकेने ६७ हजार ४६७ शेतकऱ्यांना ५६३ कोटी ३२ लाख ६२ हजार रुपये कर्जपुरवठा करून सर्वाधिक ३१.६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ३८.६६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली तर व्यापारी बँकांनी केवळ १०.१६ टक्के व ग्रामीण बँकांनी ३३.५९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या चार जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी २४.७९ टक्के, व्यापारी बँकांनी १२.४९ टक्के, तर ग्रामीण बँकेने सर्वाधिक ३१.६ टक्के कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली.

जिल्हानिहाय उद्दिष्ट व कर्जपूर्ती

लातूर

उद्दिष्ट : १६६७कोटी ८७ लाख

कर्जपुरवठा : २५४ कोटी ८७ लाख ४३ हजार

शेतकरी : ३२७१८

टक्केवारी : १५.२८

...

उस्मानाबाद

उद्दिष्ट : १३६८ कोटी २० लाख

कर्जपुरवठा : ३६३ कोटी ९६ लाख

शेतकरी : ६०१५७

टक्केवारी : २६.६०

...

बीड

उद्दिष्ट : १७६० कोटी

कर्जपुरवठा : २४३ कोटी ७२ लाख

शेतकरी : २९७८७

टक्केवारी : १३.८५

...

नांदेड

उद्दिष्ट : १५१८ कोटी ८० लाख

कर्जपुरवठा : ३०७ कोटी १७ लाख

शेतकरी : ३७३१२

टक्केवारी : २०.२२

...

औरंगाबाद

उद्दिष्ट : १३५४ कोटी ५९ लाख

कर्जपुरवठा : ३५५ कोटी २३ लाख

शेतकरी : ५८९८९

टक्केवारी : २६.२२

...

जालना

उद्दिष्ट : १२१९ कोटी ८९ लाख

कर्जपुरवठा : २०४ कोटी ३४ लाख

शेतकरी : ४८१२५

टक्केवारी : १६.७५

....

परभणी

उद्दिष्ट : ११०५ कोटी २५ लाख

कर्जपुरवठा : १५६ कोटी ५५ लाख

शेतकरी : २३२७०

टक्केवारी : १४.१६

...

हिंगोली

उद्दिष्ट : ८१० कोटी

कर्जपुरवठा : १४१ कोटी ३९ लाख

शेतकरी : २१२३०

टक्केवारी : १७.४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com