सहा हजारांवर शेतकरी हरभरा चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत

परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांवर १३ हजार ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
सहा हजारांवर शेतकरी हरभरा चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत
HarbharaAgrowon

परभणीः ‘नाफेड’अंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १६ केंद्रांवरील खरेदीपैकी ६ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या ८७ हजार ३१ क्विंटल हरभऱ्याचे ४५ कोटी ५१ लाख ७२ हजार ३९१ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे येणे बाकी आहेत.

परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या आठ केंद्रांवर १३ हजार ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शुक्रवार (ता.१७)पर्यंत या सर्व केंद्रांवर ११ हजार २३५ शेतकऱ्यांनी १ लाख ३६ हजार ८४० क्विंटल हरभऱ्याची विक्री केली.

त्यापैकी ७ हजार ३८२ शेतकऱ्यांना ८८ हजार ९६६.८५ क्विंटल हरभऱ्याचे ४६ कोटी ५२ लाख ९६ हजार ६२५ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. अजून ३ हजार ८५३ शेतकऱ्यांच्या ४७ हजार ८७४.०५ क्विंटल हरभऱ्याचे २५ कोटी ३ लाख ८१ हजार २८१ रुपयांचे चुकारे येणे बाकी आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव नाका, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या आठ केंद्रांवर ९ हजार ६९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ९ हजार ५३९ शेतकऱ्यांनी १ लाख ४८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली. आजवर ७ हजार ४० शेतकऱ्यांना १ लाख ९ हजार १३८ क्विंटल हरभऱ्याचे ५७ कोटी ७ लाख ९ हजार १३८ रुपये चुकारे अदा करण्यात आले. तर अद्याप २ हजार ४९९ शेतकऱ्यांच्या ३९ हजार १५७ क्विंटल हरभऱ्याचे २० कोटी ४७ लाख ९१ हजार ११० रुपयांचे चुकारे बाकी आहेत.

या दोन जिल्ह्यांत खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी २ लाख ३२ हजार ८१५ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आला. अजून ५२ हजार ३२० क्विंटल हरभरा खरेदी केंद्रावरच पडून आहे.

२ जून रोजी पोर्टल दुसऱ्यांदा बंद पडल्याने खरेदी थांबली होती. त्यानंतर केंद्रावर हरभरा घेऊन आलेली वाहने अनेक दिवस उभी राहिली. त्यांचे पंचनामे करण्यात आले. खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्याची लॉट एन्ट्रीही बाकी होती. त्यामुळे पोर्टल सुरू करण्याची मागणी होती. मंगळवारी (ता.१४) पोर्टल सुरू झाल्यानंतर उर्वरित लॉट एन्ट्री घेण्यात आल्या. बुधवार (ता.१५) ते शनिवार (ता.१८) पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हरभरा चुकारे स्थिती (कोटी रुपये)

केंद्र...शेतकरी संख्या...हरभरा क्विंटल...चुकारे रक्कम

परभणी...७३८...९५३९...४.९८९१

जिंतूर...४१९...५१९३...२.७१५९

बोरी...१०१६...१२६१...६.६१६७

सेलू...८२४...९८३३...५.१४२९

मानवत...२१३०...२५१३३...१३.१४४५

पाथरी...९३६...१११६६...५.८४००

सोनपेठ...६०९...७१८८...३.७५९७

पूर्णा...७१०...८२६१...४.३१२०

हिंगोली...१६२९...२२९६८...१२.०१२६

कनेरगाव...१९१६...३४४११...१७.९९७२

कळमनुरी...७९१...१०९७८...५.७४१९

वारंगा...३८३...५९३१...३.१०१९

वसमत...३१०...४६२८...२.४२०६

जवळा बाजार...११३८...१६५४५...८.६५३०

सेनगाव...६२४...१००४६...५.२५४०

साखरा...२४९...३६३८...१.८९७७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com